Breaking News

७ सर्कल येथून १९ वर्षीय युवती बेपत्ता

19-year-old girl goes missing from 7 Circle

    फलटण दि.१ सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) -  दि. ८  सप्टेंबर २०२१ रोजी  कुमारी साक्षी अविनाश जगताप वय १९ वर्षे  राहणार ७ सर्कल, साखरवाडी ता. फलटण जिल्हा सातारा ही घरात कोणास काही एक न सांगता राहते घरातून निघून गेलेली आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहिती नुसार, दि. ८  सप्टेंबर २०२१ राेजी सकाळी ६ वाजण्याच्या पूर्वी कुमारी साक्षी अविनाश जगताप वय १९ वर्षे  राहणार ७ सर्कल साखरवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा ही घरात कोणास काही एक न सांगता राहते घरातून निघून गेली असल्याची फिर्याद सरस्वती अविनाश जगताप  यांनी दिली आहे.

    मिसीग मुलीचे वर्णन - रंगाने गोरी मराठी भाषा बोलते, उंची पाच फुट दोन इंच, अंगाने सडपातळ, अंगात पिवळे रंगाचा टॉप व गुलाबी रंगाची लेगीज, चेहरा उभा, दात सर्व आहेत, डोळे काळे, नाक सरळ, केस लांब आहेत. तरी उपरोक्त मुलगी कोणास सापडल्यास फलटण ग्रामिण पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा
    अधिक तपास पोलीस हवा बी आर साबळे करीत आहेत.

No comments