Breaking News

फलटणमध्ये ‘अँटी करप्शन’ची कारवाई; महसूल प्रकरणातील लाच प्रकरणाने खळबळ

Anti-Corruption Bureau action in Phaltan; bribery case causes a stir in the area

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ३१ : महसूल विभागाशी संबंधित एका प्रकरणात तक्रार प्राप्त झाल्यानंतर फलटणमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. ५० हजार रुपये लाच स्वीकारताना एका खाजगी एजंटला रंगेहात पकडल्याचे समजते. या कारवाईमुळे फलटण शहरात खळबळ उडाली असून, एका अधिकाऱ्याचे नाव चर्चेत असल्याची माहिती आहे.

महसूल प्रकरणातील कामासाठी टाकळवाडे येथील शेतकरी यांच्याकडून लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार अँटी करप्शन ब्युरोकडे करण्यात आली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने सापळा रचून कारवाई केल्याची प्राथमिक माहिती आहे. कारवाईत ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना संबंधित व्यक्तीला रंगेहात पकडण्यात आल्याचे समजते. 

दरम्यान, या प्रकरणात नेमकी लाच कोणत्या कामासाठी मागण्यात आली होती, या व्यवहारामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची भूमिका आहे का, याबाबत याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

दरम्यान, या कारवाईनंतर ल वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव चर्चेत आले असून, त्याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असून, अधिकृत माहिती मिळाल्यानंतर कारवाईचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.

No comments