Breaking News

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या भूमीपुत्रांनी हौतात्म्य पत्कारले त्या शूर वीरांची प्रेरणा पुढील पिढीला मिळावी - पालकमंत्री बाळासाहेब पाटील

The next generation should be inspired by the brave heroes who sacrificed their lives for the freedom of the country - Guardian Minister Balasaheb Patil

    सातारा (जि.मा.का )  : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या भूमीपुत्रांनी हौतात्म्य पत्कारले त्या शूर वीरांची  प्रेरणा पुढील पिढीला मिळावी आणि देश कोणत्या परिस्थितीत  स्वातंत्र्य झाला याची माहिती मिळावी हे या मागचे उद्दीष्ट आहे,  असे पालकमंत्री बाळासाहेब पाटील वडगाव येथील हुतात्मा दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

        देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या भूमीपुत्रांनी हौतात्म्य पत्कारले त्या शूर वीरांच्या स्मरणार्थ दि. 9 सप्टेंबर रोजी हुतात्मा दिन साजरा केला जातो.   

      ब्रिटिश सरकार विरोधात निघालेल्या वडूज तहसील कार्यालयावरील मोर्चात जयराम स्वामी वडगाव, पुसेसावळी आणि उंचीठाणे येथील 9 क्रांतीकारकांना हौतात्म्य आले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वडगाव ज.स्वा. येथील  हुतात्मा स्मारकास जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.       

            यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पवार, नंदकुमार मोरे, बंडा गोडसे सर, प्रकाश घार्गे, संदीप मांडवे, सौ.भाग्यश्री भाग्यवंत, जयश्री कदम, रेखा घार्गे, अर्जुन खाडे, चंद्रकांत पाटील, भाऊसाहेब लादे, दत्ता रुद्रके, सचिन माने, संभाजी थोरात, सी.एम.पाटील, सुहास पिसाळ, कृष्णत पिसाळ, दिलीप यादव, रघुनाथ पवार, साहेबराव शिंदे, साधूनाना मगर, दुटाळ सर, वसंतराव घार्गे(गुरुजी), भाऊसो सुतार, सरपंच समिना मुल्ला, संतोष घार्गे, उपसरपंच ऋषिकेश घार्गे, परिविक्षाधीन प्रांताधिकारी जनार्दन कासार,  तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी किरण साळुंखे, तसेच हुतात्म्यांचे कुटुंबीय व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments