Breaking News

मुंजवडी येथून २१ वर्षीय युवती बेपत्ता

21-year-old girl goes missing from Munjwadi

    फलटण दि.१ सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - दि. १०/०९/२०२१ रोजी पहाटे ०५.३० वाजण्याच्या  पुर्वी शानु महमंद शेख वय २१ वर्षे रा. मुंजवडी ता. फलटण जिल्हा सातारा ही राहते घरातुन कोणास काहीएक न सांगता निघुन गेली आहे. 

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, शानु महमंद शेख व तिचे आई वडील, बहीण सर्व घरी झोपले असताना,  ता.१०/०९/२०२१रोजी पहाटे ५.३० वा. चे सुमारास मुलीची आई  सौ. शहीदा हीने उठुन मुलगी शानु हीला  उठविण्यस गेली असता मुलगी शानु ही दिसली नाही.  घरातील लोकांनी तिचा शोथा घेणेस सुरवात केली,परंतु ती सापडली नाही. 

     दि. १०/०९/२०२१ रोजी पहाटे ०५.३० वा.चे. पुर्वी माझी मुलगी शानु महमंद शेख वय २१ वर्षे रा मुंजवडी ता. फलटण जिल्हा सातारा ही राहते घरातुन कोणास काहीएक न सांगता निघुन गेली गेली असल्याची फिर्याद सरस्वती महमंद शेख  यांनी दिली आहे

     मिसींग मुलाचे वर्णन :- नाव - शानु महमंद शेख वय २१ वर्षे शिक्षण ९ वी रा.मुंजवडी ता. फलटण जि. सातारा मो न ९९७५२८०९०४, ८२६२८८९१५१

    रंगाने गोरी, मराठी भाषा, हिदी बोलते, ऊंची ५ फुट ६ इंच अंगाणे सडपातळ, अंगात ग्रेरंगाचा पंजाबी ड्रेस पिवळ्या रंगाचा ओढणी, चेहरा उभा, डोळे काळे, नाक-सरळ, केस लांब, पायात काळे रंगाची चपल वर्णनाची.

    तरी उपरोक्त मुलगी कोणास सापडल्यास फलटण ग्रामिण पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.

No comments