फलटणमधील दोन रिक्षाचालकांना ‘सन्मान निधी’चा लाभ
फलटण(गंधवार्ता वृतसेवा) दि. ३ : धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या सन्मान निधी योजनेअंतर्गत फलटणमधील दोन रिक्षाचालकांना लाभ मिळाला आहे. हमीद मेटकरी आणि बाळू कांबळे हे या योजनेचे लाभार्थी ठरले असून, त्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा सन्मान निधी मिळणार आहे.
मंडळाच्या सन्मान निधी योजनेअंतर्गत १ जानेवारी २०२६ रोजी वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्या तसेच १ जून २०२६ पर्यंत सभासद नोंदणी केलेल्या पात्र सभासदांना १० हजार रुपयांचा सन्मान निधी देण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र सभासदांनी मंडळाच्या ananddighekalyankarimandal.org या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्या बँक खात्याची आवश्यक माहिती तातडीने ऑनलाइन भरावी, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, सन्मान निधी धनादेश वितरण कार्यक्रम गुरुवार, दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता गडकरी रंगायतन, ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे. पात्र सभासदांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे. कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी संबंधित RTO अथवा DY RTO यांच्याकडे आपली उपस्थिती सुनिश्चित करावी, असे मंडळाने कळविले आहे.

No comments