Breaking News

नंदकुमार भोईटे हे कायमच सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला धावून जातात - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

पूरग्रस्तांना मदत गाडी  रवाना करताना श्रीमंत रामराजे व उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे ईतर मान्यवर
Help for flood victims from Nandkumar Bhoite

नंदकुमार भोईटे यांच्याकडून  पुरग्रस्तांसाठी मदत

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) :-  फलटण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे हे कायमच सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला धावून जात असतात. त्यांचे बंधू स्व. शामराव भोईटे यांच्या स्मरणार्थ नंदकुमार भोईटे हे कायमच विविध उपक्रम राबवत असतात. त्यांनी पुरग्रस्तांसाठी पाठवलेली मदत ही  कौतुकास्पद आहे, असे मत विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

    नंदकुमार भोईटे यांनी भरीव मदतीच्या कार्याबद्दल फलटण व पाटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार मानतो व आगामी काळामध्ये असेच समाजाच्या हिताचे उपक्रम नंदकुमार भोईटे यांनी सातत्याने राबवावेत त्यांच्या सोबत माझ्या सदिच्छा व शुभेच्छा कायमच असतील, असेही ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

    तत्पूर्वी फलटण येथील सजाई गार्डन येथे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांच्या वतीने पुरग्रस्तांना मदत ही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी हिरवा झेंडा दाखवुन रवाना केली. त्या वेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, अमित भोईटे, अजय भोईटे, संजय भोसले, अमोल भोईटे, दिपक देशमुख, फिरोज बागवान, पत्रकार युवराज पवार, शक्ती भोसले, विक्रम चोरमले, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

    नंदकुमार भोईटे हे स्व. शामराव भोईटे यांच्या स्मरणार्थ विविध उपक्रम राबवत आहेत. त्यांनी ह्या पुर्वी सुध्दा कोरोना काळामध्ये रक्तदान शिबीर, कोरोना काळामध्ये गरिब व होतकरू नागरिकांना अन्नधान्य किट्सचे वाटप, कोव्हिडं सेंटर असे विविध उपक्रम नंदकुमार भोईटे हे सातत्याने राबवत आहेत. 

तहसीलदार समीर यादव यांच्याकडे मदत देताना दिपक देशमुख, फिरोज बागवान, पत्रकार युवराज पवार, शक्ती भोसले, विक्रम चोरमले

    मागील आढवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे अनेक लोक कुटूंबासह स्थलांतरित झाले आहेत. सद्यस्थितीत स्थानिक लोकांना आवश्यक असणाऱ्या मदतीची गरज ओळखून नगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी 15 दिवस पुरेल एवढा जीवनावश्यक वस्तूचे  किट फलटण तहसीलदार व पाटणचे प्रभारी तहसीलदार समीर यादव यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. यावेळी पाटण नायब तहसीलदार प्रशांत थोरात, महादेव आष्टेकर, प्रफुल्ल जाधव उपस्थित होते. 

    पाटण तालुक्यातील नेरळे, चाफेर, मळा, पाथरपुंज, नाव, कोळणे याठिकाणी प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागातील लोकांना किटचे वाटप करण्यात आले.

No comments