Breaking News

व्हॉट्सअप ग्रुपवर गाडी विकण्याची पोस्ट केल्यामुळे एकास मारहाण ; 7 जणांवर गुन्हा

One beaten up for posting car sales on WhatsApp group; Crime against 7 persons

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  - व्हॉट्सअप ग्रुपवर गाडी विकण्यासंदर्भात केलेली पोस्ट, बरड ता. फलटण येथील युवकास महागात पडली आहे. बरड येथील युवकाने गावातील रॉयल रामोशी बरड या व्हॉट्सअप ग्रुप वर, गाडी विकणे संदर्भात पोस्ट सेंड केली होती याचा राग मनात धरून, त्या युवकास मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी बरड येथीलच सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन वरून मिळालेल्या माहितीनुसार, रॉयल रामोशी ग्रुप बरड या व्हॉट्सअप ग्रुपवर अक्षय पिलाजी आवटे याने  चारचाकी गाड़ी इको नं.एम.एच. 12 एच. व्ही. 6724 असा फोटो काढुन तो वरील ग्रुपवर टाकुन सदर गाड़ी विकणे आहे, अशी पोस्ट केली होती. याचा राग मनात धरून, दि.29/07/2021 रोजी रात्री 9.45 वा सुमारास बरड ता. फलटण गावचे हृददीत खंडोबा मंदिराचे जवळ 1. विशाल सुरेश मदने, 2. पवन मधुकर जाधव, 3. रमेश मधुकर जाधव, 4. करण पांडुरंग कोळी, 5. ऋषिकेश भगवान कोळी, 6. अल्पवयीन, 7. वाघेश्वर आडके सर्व रा. बरड ता. फलटण हे  तीन मोटर सायकलवरुन तेथे येवुन त्यांना, आवटे यास, तु आमचे रॉयल रामोशी ग्रुप बरड या व्हाट्सअप ग्रुप वर मनोज काशिद यांची ईको गाडी विकणे आहे असे लिहून त्यागाडीचा फोटो का टाकला. असे विचारुन 1. विशाल मदने, 2. पवन जाधव, 3. रमेश जाधव, या तीघांनी अक्षय आवटे यास हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण करुन, आई बहिणीवरुन शिवीगाळ केली, तसेच जातिवाचक शिवीगाळ करून, तुला लय माज आला आहे का, तुला जिवंत ठेवत नाही. असे म्हणुन तीघांनी अक्षय आवटे उचलुन जमीनीवर आपटले, त्यावेळी तेथे हजर असणारे 4. करण पांडुरंग कोळी, 5. ऋषिकेश भगवान कोळी, 6. अल्पवयीन 7. वाघेश्वर आडके यांनी याला आता सोडू नका, जोरात मारा, याला कोण सोडवायला येत नाही. आम्ही बघतो असे म्हणुन शिवीगाळ दमदाटी केली असल्याची फिर्याद अक्षय पिलाजी आवटे वय 18 राहणार बरड तालुका फलटण यांनी दिली आहे. फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला आयपीसी व ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत वरील सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी एक अल्पवयीन संशयित सोडून उर्वरित सहा संशयितांना अटक करण्यात आली.  

    अधिक तपास पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे हे करीत आहेत.

No comments