Breaking News

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार 15 ऑगस्ट 2021 चा ध्वजारोहण


The flag hoisting of 15th August 2021 will be done by the Guardian Minister Balasaheb Patil

    सातारा - भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 74 व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दि. 15 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 9.05 वा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास शासकीय अधिकारी-कर्मचारी व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे

        मुख्य शासकीय समारंभात नागरिकांना सहभाग घेता यावा यासाठी दि. 15 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 8.35 ते 9.35 वा. चे दरम्यान ध्वजारेहणाचा व इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ करण्यात येऊ नये. तथापि, इतर शासकीय कार्यालयात अथवा संस्थेचा त्या दिवशी ध्वजारोहण समारंभ करावयाचा असेल तर तो त्या दिवशी सकाळी 8.35 पूर्वी किंवा 9.35 नंतर करावा असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

No comments