Breaking News

तृतीयपंथीयांनी ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळण्यासाठी अर्ज करावेत

Third gender should apply for identity card and identity card

    सातारा (जिमाका) : तृतीयपंथीयांचे कल्याण व हक्कांचे संरक्षण अंतर्गत पात्र तृतीयपंथीयांनी ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळविण्यासाठी नॅशलन पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन (National Portal For Transgender Persons) या वेबसाईटला भेट देवून अल्पाय ऑनलाईन यावर आपला युजर आयडी व पासवर्ड तयार करुन आपली सर्व माहिती भरुन  अर्ज करावेत असे आवाहन नितीन उबाळे, सहायक आयुक्त समाज कल्याण सातारा यांनी केले आहे.

    ऑनलाईन अर्जासोबत आयकार्ड साईज फोटो, स्कॅन केलेली सही, आपण तृतीयपंथीय असलयाबाबतचे प्रतिज्ञापत्र, शासकीय रुग्णालयातील मानसोपचारतज्ञ यांनी दिलेला अहवाल व इतर आवश्यक कागदपत्रे संलग्न करावीत असेही श्री. उबाळे यांनी कळविले आहे.          

No comments