राजेगटाकडुन हरीष काकडेंना संधी मिळणार का?
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१५ ऑक्टोबर २०२५ - गेल्या ३५ ते ४० वर्षे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे फलटण नगरपरिषदेवर निर्विवाद वर्चस्व आहे. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे नगरपरिषदेचे ब्रँड अँब्मेसेडर म्हणून यांचेकडे पाहिले जाते. श्रीमंत रामराजे यांनी दिलेला उमेदवार म्हणजे विजय निश्चितच. हे ठरलेले गणित अजुन पर्यंत विरोधकांना सुटलेले नाही. त्यातच मंगळवार पेठ म्हणजे श्रीमंत रामराजेंचा बालेकिल्ला. हे सर्वश्रुत आहे. गेल्या ३५ ते ४० वर्षात फलटणमधील मतदार नागरीकांनी श्रीमंत रामराजेंवरच विश्वास ठेवला आहे. गेल्या ३५ वर्षात फलटण नगरपालिकेत काकडेंना संधी मिळालेली नाही. माजी नगरसेवक मधुकर काकडे व माजी नगरसेवक कालकथित विजय काकडे यांनी श्रीमंत रामराजे यांचा विश्वास बाळगत प्रामाणिकपणे वार्डातील कामे पार पाडली. अजुनही त्यांचे नाव समाजातील प्रतिष्ठीत नागरीक म्हणून संबोधले जाते.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे यंदा काकडेंचा उमेदवार देतील का? यंदा काकडेंना नगरपालिकेत संधी मिळेल का? या प्रतिक्षेत आहेत. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे विश्वासू समजले जाणारे सामाजिक कार्यकर्ते हरीष काकडे (आप्पा) यांच्या सौभाग्यवती वर्षा काकडे यांच्या माध्यमातून काकडेंना संधी मिळेल का? अशी चर्चा मतदार नागरीकातून होत आहे.
हरिश काकडे यांनी सामाजिक कार्य प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. हरिश काकडे यांनी आपल्या सामाजिक कार्यात आपल्या पत्नीची साथ असल्यामुळेच आपण नागरीकांची तसेच सामाजिक कामे पार पाडु शकलो असे सांगतात. फलटण नगरपालिकेतील दिव्यांगासाठी निधी मिळवून देणे, पेन्शन चालू करणे यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्याचबरोबर समाजाच्या न्यायहक्कासाठी विविध मोर्चे, आंदोलने करण्यात आली. तसेच नगरसेवक सनी (दादा) अहिवळे यांच्या माध्यमातून व सहकार्यातून विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडलेले आहेत व पाडत आहेत. हरीष काकडे यांच्या कामाची दखल घेवून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी हरीष काकडे यांना राष्ट्रवादीचे सातारा जिल्हाध्यक्ष पद दिले. या संधीमुळे राजे गटाची प्रतिष्ठा सांभाळून समाजातील विविध कामे फलटण तालुक्यातील बौध्द व मागासवर्गीयांच्या समस्या सोडविण्याचे काम हाती घेतले. तसेच लोकसभा निवडणूकीला हाती घेतलेले काम योग्य पध्दतीने पार पाडले निवडणूकीला मंगळवार पेठेतून सनी अहिवळे यांच्या बरोबरीने उमेदवाराला जास्तीचे लिड देण्यासाठी यशस्वी ठरले. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा विश्वास जपत दिलेल्या संधीची योग्य कामे पार पाडल्याने मंगळवार पेठेतील सामान्य मतदार हरीष काकडे यांच्या पत्नीच्या माध्यमातून काकडेंना नगरपालिकेमध्ये संधी मिळेल का? याच्या प्रतिक्षेत आहेत.
No comments