Breaking News

कृषीदूताकडून तिरकवाडी येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Guidance to the farmers of Tirakwadi from the Agriculture Envoy

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  -  डोंगरशेळकी तांडा (उदगीर) येथील कृषी महाविद्यालयाचे ऋतुराज भरत कर्णे या कृषिदूताने फलटण तालुक्यातील तिरकवाडी येथील शेतकऱ्यांना शेतीशी निगडीत विविध विषयावर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना शेतीमध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी उपाययोजना सांगतानाच त्यांना विविध शासकीय योजनांची माहितीही त्यांच्याकडून देण्यात येत आहे. 

    ग्रामीण जनजागृती कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी आधारित उपक्रम व औद्योगिक कार्यक्रम अंतर्गत कृषिदूत (2020-2021) अंतर्गत त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय तिरकवाडी  येथे भेट देऊन, सरपंच तसेच ग्रामसेवक यांच्याकडून माहिती घेतली. याप्रसंगी सरपंच पुजा आ. पवार  ग्राम विकास अधिकारी सुरेश निंबाळकर व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

    डोंगरशेळकी तांडा उदगीर येथील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए एम पाटील, उपप्राचार्य डॉ. एल व्ही पिंपलपल्ले, कार्यक्रम समन्वयक डॉ. जी बी अडसूळ, कार्यक्रम अधिकारी डॉ. एस एम मुळे व एस टी धफाडे, ए एल खरे, व्ही एल सोमवंशी, पी एस राठोड  यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी क्षेत्राशी संलग्न असणारा ग्रामीण जनजागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

    या उपक्रमांतर्गत शेतातील विविध समस्या व त्याचे निरसन, माती परीक्षण, जलसंवर्धन, बीज प्रक्रिया, पशूपालन, दुग्ध व्यवसाय, पिकावरील किड व रोग नियंत्रण तसेच शेती विषयक नवीन संकल्पना यावर हे कृषिदूत शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत.                            

No comments