वसंतराव माणकू भोईटे यांचे निधन
Vasantrao Manaku Bhoite passed away
फलटण (प्रतिनिधी) - निंबळक, ता. फलटण येथील प्रगतशील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते वसंतराव माणकू भोईटे यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले.
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आपली अल्प शेती मोठ्या जिद्दीने, कष्टाने आणि स्वाभिमानाने करुन त्यांनी कुटुंबाचा चरितार्थ चालविताना मुलांना उच्च शिक्षीत केले. सततच्या मेहनतीद्वारे आणि प्रामाणिकपणाने वागून त्यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन ती अनुकुल केली. आता सगळे स्थिरस्थावर झाले होते. शेती चांगली होती, निंबळक आणि फलटण येथे उत्तम घरे (बंगले) उभारली आहेत.
मुला-मुलींची शिक्षणे, लग्ने, सुना, जावई, नातवंडे असा प्रपंच फुलला आहे. दोघा पती-पत्नीची प्रकृती उत्तम असल्याने भरल्या घरात आनंदाचे वातावरण असताना वसंत आण्णा हे सगळे सोडून अचानक गेले ही कोणालाही न पटणारी पण सत्त्य असणारी घटना सर्वांनाच स्विकारावी लागत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, २ विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे. निवृत्त नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे हे त्यांचे सुपुत्र आणि तरडगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. जयश्री चव्हाण या त्यांच्या सुकन्या आहेत.
No comments