आझाद समाज पार्टीच्या फलटण शहर व तालुका कार्यकारणीच्या निवडी बिनविरोध
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - आझाद समाज पार्टीच्या बैठकीत फलटण शहर व तालुका कार्यकारणी पदाधिकाऱ्यांच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्या. फलटण शहर अध्यक्षपदी योगेश माने यांची तर फलटण तालुकाध्यक्षपदी मनोज आढाव यांची निवड करण्यात आली.
आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद व राज्याध्यक्ष राहूल प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली, फलटण येथे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सनी काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निवडी एकमताने पार पडल्या. यावेळी जाहीर करण्यात आलेल्या निवडी पुढील प्रमाणे आहेत.
पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मंगेश आवळे, सातारा जिल्हाध्यक्ष आतिष कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष महादेव गायकवाड, शहर कार्यकारीणी - फलटण शहर अध्यक्ष योगेश माने, कार्याध्यक्ष साहील काकडे, शहर उपाध्यक्ष लखन अडागळे, गणेश रणपीसे, सुरज भैलुमे, सुनिल पवार, सचिव अर्जून जाधव, संपर्क प्रमुख राहूल म्हेत्रे.
फलटण तालुका कार्यकारीणी फलटण तालुकाध्यक्ष मनोज आढाव, कार्याध्यक्ष जिवन मोरे, उपाध्यक्ष किरण मोरे, केतन जाधव, बाळासो लोंढे, अजित मोरे, संघटक शंकर अडागळे, संपर्क प्रमुख स्वप्निल मोहिते.
सदर निवडीनंतर नुतन पदाधिकारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.
No comments