वाठार फाटा ते वडजल जाणाऱ्या रोडच्या कडेला अर्भक आढळले ; संपर्क साधावा
Infants were found on the side of the road from Wathar fata to Vadjal; Should be contacted
संबंधितांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा
सातारा (जिमाका) : दीड महिने अंदाजे या नवजात अर्भकास दि.6 मे 2021 रोजी पहाटे 5.30 मी. मौजे वडजल ता. फलटण जि. सातारा या गावाच्या हद्दीत वाठार फाटा ते वडजल जाणाऱ्या रोडच्या कडेला नवजात अर्भकास अज्ञात व्यक्तीने सोडून दिलेआहे. नवजात स्त्री अर्भकाचे पालक अथवा नातेवाईक आढळून आल्यास त्यांच्या चौकशीबाबत व तिला ताब्यात घेण्याबाबत 30 दिवसांच्या आत अध्यक्ष , बाल कल्याण समिती,निरीक्षण गृह,बालगृह ,सातारा फोन नं. 02162- 238025या दुरध्वनीवर किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी ,बस स्टॅन्डच्या पाठीमागे प्रशासकीय इमारत दुसरा मजला. फोन नं. 02162- 237353 अथवा द्रोणागिरी शिक्षण संस्था संचलित शिशुगृह, (अनाथ बालकाश्रम ) म्हसवड . फोन नं. 9112908689 येथे संपर्क साधावा.
अन्यथा तिचे शासकीय नियमानुसार कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा विचार करण्यात येईल.याची संबंधितांनी नोंद घ्यावी. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ,सातारा यांनी कळविले आहे.
No comments