कै. किरण विचारे यांचे क्रीडाक्षेत्रात मोलाचे योगदान - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
कै. किरण विचारे यांच्या कुटुंबियांना शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेकडून निधी सुपूर्द
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) :- खो-खो क्रीडाक्षेत्रात मोलाचे योगदान दिलेल्या कै. किरण विचारे यांच्या अचानक जाण्याने क्रीडा क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत, फलटण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेने, निधी गोळा करून, किरण विचारे यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करून, सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र खो-खो संघटनेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
फलटण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना फलटण यांच्या वतीने कै. किरण विचारे सर यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना जमा केलेला निधी महाराष्ट्र खो-खो संघटनेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते श्री विचारे परिवाराला देण्यात आला. त्यावेळी श्रीमंत संजीवराजे बोलत होते. याप्रसंगी फलटण तालुका क्रीडा अधिकारी महेश खुटाळे, तायप्पा शेंडगे, सचिन धुमाळ आणि फलटण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना फलटण चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेच्या या सामाजिक बांधिलकीच्या कार्याबद्दल कौतुक करून, आभार व्यक्त केले.
No comments