Breaking News

माउली फाऊंडेशनच्यावतीने वसुंधरा संवर्धन आणि हरितवारी अंतर्गत फलटण येथे वृक्षारोपण

वृक्षारोपण करताना प्राचार्य पंढरीनाथ कदम,दीपक फरांदे
Tree Planting at Phaltan under Earth Conservation and Greenery on behalf of Mauli Foundation

    फलटण(प्रतिनिधी)-  श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रस्थान सोहळ्या दिनी माउली फाऊंडेशनच्यावतीने वसुंधरा संवर्धन आणि हरितवारी या उपक्रमाअंतर्गत मुधोजी महाविद्यालय फलटण येथे पर्यावरण पूरक रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.

    मुधोजी महाविद्यालयाचे नवनियुक्त  प्रभारी प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम आणि माउली सेवेकरी  दीपक फरांदे , माजी प्रभारी प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, मुंबई उच्च न्यायालयातील ॲड. विशवनाथ टाळकुटे यांच्या शुभहस्ते पर्यावरणपूरक रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले . यावेळी मुधोजी कॉलेज परिसर हरित करण्यासाठी विशेष कष्ट घेणारे डॉ सुधीर इंगळे ,  प्रा.सतीश पवार आणि झाडाची जोपासना करणारे वनपाल आणि कर्मचारी यांचाही निसर्गप्रेमी म्हणून सत्कार करण्यात आला . विशेषबाब म्हणजे मागील चार वर्षात आषाढीवारी दरम्यान माउली फाउंडेशनमार्फत लावलेले ५०० हुन अधिक वृक्षाची उत्तम जोपासना महाविद्यालातील कर्मचारी आणि विद्याथी यांनी केली आहे ते पाहून सर्वाना समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमास माऊलीच्या फलटण टीममधील सेवेकरी  निलेश गनबोटे , अभिजित माळवदे ,ॲड. नामदेव शिंदे ,ॲड. राहुल कर्णे नसिर शिकलगार  प्रशांत धनवडे , प्रा. मनीष निंबाळकर, डॉ. गणेश शिंदे , जावेद शेख ,विशाल मोहाटकर , ॲड. राहुल सतुटे , हेमंत भोई, विलास जाधव  वीरेन सटाले इत्यादी निसर्गप्रेमींनी अत्यंत आवडीने वृक्षारोपण केले.

प्रास्ताविक ॲड. विशवनाथ टाळकुटे यांनी केले तर ॲड. राहुल कर्णे यांनी आभार मानले .

No comments