पै. बजरंग पवार यांचे निधन
गोखळी ( प्रतिनिधी) - फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील पवारवाडी (आसू) येथील पै. बजरंग शांतीलाल पवार (३४) यांचे अल्पशा आजारपणामुळे निधन झाले.
बजरंग पवार बारामती येथील पियाजो कंपनी मध्ये कार्यरत होते. सांगली येथे कुस्ती मल्लविद्या घेऊन अनेक दिवस विविध भागात कुस्ती आखाडे गाजवले पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील नामांकित मल्ल म्हणून परिचित होते. त्यांचे वडील स्वर्गीय शांतीलाल पवार हेही नामांकित मल्ल म्हणून परिचित होते. अत्यंत कमी वयात अकाली निधनाने फलटण पूर्व भागात हळहळ व्यक्त होत आहे.पवारवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते मदन पवार यांचे पुतणे होत.
त्यांचे पश्चात आई, पत्नी, दोन लहान मुली,एक लहान मुलगा,एक विवाहित भाऊ असा परिवार आहे.
No comments