Breaking News

बेरोजगार उमेदवारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

Organizing online job fairs for unemployed candidates

    सातारा (जिमाका):- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांच्यामार्फत 7, 8,9 व 10 जून रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.

    ऑनलाईन रोजगार मेळाव्यात बेरोजगार उमेदवारांनी https:rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉनलाईन नोंदणी करुन सहभागी व्हावे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाच्या 02162-2339938 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा satararojgar1@gmail.com या ईमेलवर आयडीवर संपर्क साधावा.

No comments