Breaking News

फलटण येथे पोलिसांचा छापा ;1500 किलो गोमांसासह 9 लाख 10 हजाराचा मुद्देमाल जप्त

Police raid at Phaltan; 9 lakh 10 thousand items including 1500 kg of beef seized

गंधवार्ता वृत्तसेवा फलटण,  दि. 4 जून - कुरेश नगर, फलटण येथे पोलिसांनी छापा टाकून, 1500 किलो गोमांस, एक बिगर नंबर महिंद्रा पिकप, मारुती 800, एक मोटर सायकल, असा 9,10,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी कुरेशीनगर येथील 7 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 03/06/2021 रोजी सायंकाळी 7.55 वाजण्याच्या सुमारास  कुरेशी मोहल्ला, मंगळवार पेठ फलटण  येथे इरफान याकूब कुरेशी, नय्युम कुरेशी व त्यांचे पाच साथीदार यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना, बेकायदेशीरपणे जनावरांची कत्तल करीत असताना 1500 किलो गोमांस व कत्तल करण्यासाठी आणलेले जिवंत जनावरे व गोमांस वाहतूक करण्यासाठी लागणाऱ्या वाहनासह एकूण किंमत रुपये 9,10,000/- मुद्देमालासह मिळून आले आहेत. सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

     सदरची कारवाई सातारा चे पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे  यांचे मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, सहा. पोलीस निरीक्षक नवनाथ गायकवाड , सहा. पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, सहा. फौजदार भोईटे, पोलीस हवालदार ठाकूर, पो. ना. चातुरे, पो. ना. सूळ, पो. ना. लावंड, पो. ना. भोसले, पो.ना. वाडकर, पो. कॉ. बडे, पो. कॉ. लोलपोड यांनी केलेली आहे.

           सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम हे करीत आहे.

No comments