फलटण वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड.उमेश कदम तर सचिवपदी अॅड.अनिरुद्ध सस्ते विजयी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१५ - फलटण वकील संघाच्या सन २०२६-२७ वर्षीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अॅड. उमेश विजय कदम तर सचिव पदाच्या निवडणुकीत अॅड. अनिरुद्ध संपतराव सस्ते हे विजयी झाले. उर्वरित पदाधिकार्यांच्या निवडी या बिनविरोध करण्यात आल्या. विजयी उमेदवारांचे व कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. विशेष म्हणजे, फलटण वकील संघाच्या इतिहासात सर्वात कमी वयाचे अध्यक्ष म्हणून अॅड. उमेश कदम यांची नोंद झाली आहे.
फलटण वकील संघाच्या सन २०२६-२७ यावर्षीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अॅड. बजरंग शामराव जाधव व अॅड. उमेश विजय कदम हे उमेदवार निवडणुक रिंगणात होते. दोघांमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत अॅड. उमेश विजय कदम हे विजयी झाले. तर अॅड. अनिरुद्ध संपतराव सस्ते व अॅड. रवींद्र जगन्नाथ अहिवळे हे सचिव पदासाठी निवडणुक रिंगणात होते, त्यामध्ये अॅड. अनिरुद्ध सस्ते हे विजयी झाले.
दरम्यान, उपाध्यक्षपदी अॅड. मेघा आनंदराव अहिवळे, खजिनदारपदी अॅड. शाम सुभाष अहिवळे, सहसचिवपदी अॅड. शारदा राजकुमार दीक्षित, तर सदस्यपदी अॅड. रोहिणी संजय भंडलकर आणि अॅड. चैत्राली दशरथ शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडणुकीसाठी अॅड. राहुल व्ही. बोराटे, अॅड. सागर एम. सस्ते आणि अॅड. सुनील एन. शिंदे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.

No comments