Breaking News

फलटण तालुक्यात 167 कोरोना बाधित ; शहर 9 तर ग्रामीण 158

Corona virus Phaltan updates :  2 died and 167 corona positive

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 4 जून 2021 - फलटण तालुक्याची  कोरोना covid-19 बधितांची संख्या ही 167 आली आहे.  यामध्ये आर.टी.पी.सी.आर. 145 व आर.ए.टी.   22 चाचण्यांचा समावेश आहे.  मात्र  जिल्हा प्रशासनाकडून आज  जाहीर करण्यात आलेली फलटण तालुक्यातील  कोरोना बधितांची संख्या 108 आहे.   

    आज  मिळालेल्या  आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 167 बाधित आहेत.  यामध्ये फलटण शहर 9 तर ग्रामीण भागात साखरवाडी 23, कोळकी 10, बरड 7, जिंती 7, कुसुर 6, ढवळेवाडी 6, दुधेबावी 5, घाडगेवाडी 1, खराडेवाडी 2, खामगाव 2, खुंटे 1, खटकेवस्ती 2,  ठाकूरकी1,   मठाचीवाडी 1, मांडवखडक 2, मुरूम 3, बिबी 4, पिंपरद 1, विंचुर्णी 1, विठ्ठलवाडी 1, विडणी 4,  निंबळक 2, निरगुडी 1,पवारवाडी 5, फरांदवाडी 2, रावडी खु 2, राजाळे1, राजुरी 2,  सरडे 1,  सांगवी 1,  साठे 1,  सासकल 1, सालपे 5, वाखरी 1, वडले 1, चौधरवाडी 1, तरडगाव 1, तडवळे 4, जाधवाडी 1,नांदल 7, आसू 1, आदर्की खु 1, अलगुडेवाडी 2, गोखली 9,  गुणवरे 2, राजवडी ता माण 1,  धुळदेव 1,  काळज 1,कोराळे 1, शिंदेवाडी 1, रावडी बु , सस्तेवाडी 1, वाठार निंबाळकर 1, वडगाव 1,आदर्की बु 1, परखंदी ता माण 1,शिंगणापूर ता  माण 1, आनेवाडी 1 ढवळ 1, बरड 2, कोळकी 2, कुसुर 2, मठाचीवाडी 1, बिबी 3 , मिरेवाडी 1, पिंपरद 4, विडणी 2, जिंती 3, निंबळक 2, भाडळी 3, पाडेगाव 6, राजाळे 3, राजुरी 6, साखरवाडी 7, सोनगाव 1, दालवडी 1, वाठार निंबाळकर 1,  वेळोशी 1, चौधरवाडी 1, तरडफ ,  तरडगाव 1, तांबवे 2, तावडी 1, नांदल 9, कापडगाव 1, मुरूम 1, होळ 2, परहर 2, रावडी 2, तडवळे 2,आळजापूर 1 रुग्ण बाधित सापडले आहेत. 

सातारा जिल्ह्यात 1588 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 43 बाधितांचा मृत्यू

     सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1588 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 43 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 42(7770), कराड 237 (23033), खंडाळा 102 (10702), खटाव 249 (16635), कोरेगांव 257 (14866),माण 129 (11813), महाबळेश्वर 22 (4099), पाटण 81 (7191), फलटण 108 (26860), सातारा 294 (36230), वाई 58 (11798) व इतर 9 (1088) असे आज अखेर  एकूण 172085 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

      तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (171), कराड 7 (664), खंडाळा 2 (138), खटाव 0 (425), कोरेगांव 3 (328), माण 8 (225), महाबळेश्वर 0 (44), पाटण 3 (160), फलटण 2 (258), सातारा 15 (1079), वाई 2 (309) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3801 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

No comments