Breaking News

मुलांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून हर्षल लोंढे यांनी दिली कोरोना केअर सेंटरला वस्तूरुपी भेट

मान्यवारांच्या उपस्थितीत कोरोना केअर सेंटरला १० वाफेच्या मशीन, ३ ऑक्सी मिटर, २ टेंपरेचर मशीन भेट देताना हर्षल लोंढे 

Hershel Londhe gives a gift to Corona Care Center to avoid children's birthday expenses

    गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण - यश उद्योग समूहाचे संस्थापक हर्षल अरुण लोंढे व ओरीयन नागरी पतसंस्था व्हा. चेअरमन सौ.मेघा हर्षल लोंढे यांनी सामाजिक बांधिलकी जपत, आपल्या मुलांच्या चि.यश व चि श्रेयांश हर्षल लोंढे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा इतर खर्च टाळून, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणच्या कोविड केअर सेंटरला, १० वाफेच्या मशीन, ३ ऑक्सी मिटर,२ टेंपरेचर मशीन भेट म्हणून दिल्या. 

    कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणच्या माध्यमातून ढवळपाटी, वाखरी ता. फलटण (जलनायक श्रीमंत रामराजे नगर) येथील उप बाजार आवारातील कृषी लक्ष्मी मंगल कार्यालयात सुरु करण्यात आलेल्या कोरोना विलगीकरण कक्षाचे उदघाटन  श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी यश उद्योग समूहाचे संस्थापक हर्षल अरुण लोंढे यांनी सेंटरला, १० वाफेच्या मशीन, ३ ऑक्सी मिटर,२ टेंपरेचर मशीन कोरोना  केअर सेंटरला भेट दिल्या. यावेळी आ. दिपकराव चव्हाण होते, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, उपसभापती भगवानराव होळकर, बाजार समिती संचालक, पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, गोविंदचे संचालक श्रीमंत सत्त्यजितराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments