गोखळी कोरोना विलगीकरण कक्षास आ. निलेश लंके यांची भेट
![]() |
| गोखळी ता. फलटण येथील कोरोना विलगीकरण कक्षास आ. नीलेश लंके यांनी भेट दिली समवेत दिगंबर आगवाणे व इतर |
MLA Nilesh Lanke visits Gokhali Corona care center
गोखळी (राजेंद्र भागवत ) - गोखळी ता. फलटण येथील कोरोना विलगीकरण कक्षाचे वातावरण हे रुग्णांना कोरोनामुक्त होण्यासाठी पोषक असून, ग्रामीण भागात उभारलेला कोरोना सेंटरचा उपक्रम हा कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी केले.
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील कोरोना विलगीकरण कक्षास आज पारनेर (अहमदनगर)चे आमदार निलेश लंके यांनी भेट दिली. याप्रसंगी त्यांच्या समवेत आयुर उद्योग समूहाचे संस्थापक दिगंबर आगवणे उपस्थित होते.
आ. निलेश लंके यांनी गोखळी कोरोना विलगीकरण कक्षात थेट प्रवेश करून, कोरोना बाधीत रुग्णांची भेट घेऊन, त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली आणि त्यांना धीर दिला. कक्षातील रूग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधा बद्दल चौकशी करून, कोणतेही अनुदान न घेता लोकसहभागातून चालविलेल्या कोरोना विलगीकरण कक्ष इतर ग्रामस्थांना अनुकरणीय असल्याचे सांगितले. याबद्दल गोखळी करांचे अभिनंदन केले.
त्यानंतर आमदार निलेश लंके यांचे हस्ते विलगीकरण कक्षातील, कोरोना मुक्त रुग्णांना रोपटे देऊन निरोप देण्यात आला.
आ. निलेश लंके यांना कोरोना विलगीकरण कक्षा बद्दल सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम जाधव यांनी माहिती दिली. गोखळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज तात्या गावडे यांनी रोपटे देऊन आ.निलेश लंके यांचे स्वागत केले. विलगीकरण कक्षातील रूग्णांना दररोज चहा नाष्टा देणारे दीपक चव्हाण यांचा झाडं देऊन निलेश लंके यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे फलटण तालुका अध्यक्ष सागर गावडे पाटील, पोलिस पाटील विकास शिंदे, उपसरपंच डॉ अमित गावडे, रमेश गावडे,. सुनील बापू मदने, हनुमान दहिहंडी संघाचे अध्यक्ष योगेश भागवत, माजी उपसरपंच ज्ञानदेव घाडगे,अभि जगताप, राजेंद्र भागवत, शेखर लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.


No comments