सद्गुरु व महाराजा उद्योग समुहाच्या वतीने ५०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप
![]() |
जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण प्रसंगी सद्गुरु व महाराजा उद्योग समुहाचे संस्थापक दिलीपसिंह भोसले, नगरसेविका सौ. मधुबाला भोसले, तेजसिंह भोसले, रणजीतसिंह भोसले, गिरीश फणसे व इतर |
Sadguru and Maharaja Udyog Samuha distributes essential items kits to 500 families
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण - कोरोना संसर्ग थोपवण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य जनता आर्थिक अडचणीत सापडली आहे, याची जाणीव ठेवून, सद्गुरु व महाराजा उद्योग समुहाच्या वतीने प्रभाग क्रमांक ११ मधील ५०० कुटुंबांना किटचे वितरण करण्यात आले.
लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील गोरगरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नकार्यासाठी सद्गुरु उद्योग समूह फलटण व महाराजा मंगल कार्यालय फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने महाराजा मंगल कार्यालय पूर्णतः मोफत देण्यात येत आहे.
या अगोदरही सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाच्या वतीने वेळोवेळी सर्वसामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वितरण करण्यात आले होते. त्याचबरोबर रुग्णांना औषध उपचार, आर्थिक अडचणी सोडवण्याठी सद्गुरू व महाराजा उद्योग समूह पुढे असतो.
No comments