Breaking News

राज्यात संस्थात्मक विलगीकरणावर भर – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Emphasis on Institutional Separation in the State - Information by Health Minister Rajesh Tope

    मुंबई - : राज्यातील ज्या जिल्ह्यांचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर राज्य सरासरीपेक्षा जास्त आहे अशा जिल्ह्यांमधील विशेष करून ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्याच्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. होम आयसोलेशनची सुविधा सुरू राहील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

    दि. १६ ते २३ मे कालावधीतील ज्या जिल्ह्यांचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे त्यांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज घेण्यात आला. ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरणावर भर देतानाच आवश्यक तेथे कोविड केअर सेंटर्सची संख्या वाढवावी. १५ व्या वित्त आयोगाच्या उपलब्ध निधीतून ग्रामपंचायतींनी २५ टक्के निधी हा कोविड केअर सेंटर उभारणीसाठी वापरण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी या बैठकीत दिल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

No comments