Breaking News

अल्पसंख्याक विकास विभागामार्फत प्रधानमंत्री जनविकास तसेच बहुक्षेत्रीय विकास कार्यक्रमाची माहिती वेबसाईटवर उपलब्ध

Information on Prime Minister's Public Development and Multisectoral Development Program through the Minority Development Department is available on the website
    मुंबई  : अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राबविण्यात येणारा प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम (PMJVK) तसेच पुर्वीचा बहुक्षेत्रीय विकास कार्यक्रम यांची इत्यंभूत माहिती आता विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे.

    प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम (PMJVK) हा अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातील अल्पसंख्याक समुदायांना विशेषत: शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकास क्षेत्रात चांगल्या सामाजिक, आर्थिक, पायाभूत सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे. यापूर्वी हा कार्यक्रम शासनाद्वारे बहुक्षेत्रीय विकास कार्यक्रम म्हणून राबविण्यात आला. प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यातील 10 जिल्हा मुख्यालये, 28 गट व 34 शहरांचा समावेश करण्यात आला आहे. या ठिकाणी या योजनांमधून झालेली विविध विकासकामे, त्यासाठी मंजुर झालेला निधी, कामाची सद्यस्थिती, काम पूर्ण होण्याची संभाव्य तारीख आदी इत्यंभूत माहिती जनतेच्या माहितीसाठी अल्पसंख्याक विकास विभागाच्या वेबसाईटवर खालील लिंकवर उपलब्ध करण्यात आली आहे.
  https://mdd.maharashtra.gov.in/1200/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B8 अधिक माहितीसाठी विभागाच्या https://mdd.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.

No comments