जिल्हा परिषदेच्या ८ जागांसाठी ३३ तर पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ५० उमेदवार रिंगणात
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२८ जानेवारी २०२६ - फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत तिरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले असून मुख्य लढत भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेना व राष्ट्रीय समाज पक्ष यांच्यात होणार असून कोळकी,तरडगाव,अन् गुणवरे गटाच्या लढतीकडे संपूर्ण फलटण तालुक्याचे लक्ष वेधले जाणार आहे.तसेच काही ठिकाणी शिवसेना उबाठा,राष्ट्रीय काँग्रेसचे,वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष,उमेदवार अन् अपक्ष उमेदवार आपले फलटण तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गट व सोळा पंचायत समिती गणांसाठी विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई होणार आहे.
दरम्यान कोळकी जिल्हा परिषद गटात ६ उमेदवार,गुणवरे(३),तरडगाव(२),साखरवाडी, पिंपळवाडी(४),बरड(६),विडणी(३),हिंगणगाव(४),वाठार निंबाळकर(५), एकूण आठ गटात तब्बल ३३उमेदवार लढत होणार आहे.दरम्यान पंचायत समिती साठी पाडेगाव गण (४) तरडगाव गण(३) साखरवाडी पिंपळवाडी (२), सस्तेवाडी गण(३),सांगवी गण(२), विडनी (२), गुणवरे(३),आसू (२),बरड(३),दुधेबावी(३), कोळकी (४), जाधववाडी (फ)(३),वाठार निंबाळकर (४), सुरवडी(५), सासवड (२)असे सोळा पंचायत समिती गणांसाठी एकूण पन्नास उमेदवार पंचायत समिती गणांसाठी आपले नशीब आजमावत आहेत.
जिल्हा परिषदेच्या आठ जागांवर शिवसेना,भाजप व रासपा यांच्यात तिरंगी होणार असून तीन ठिकाणी उबाठा गट सुद्धा लढत असल्याने काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढत होणार आहे.विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई होणार असल्याने, फलटण तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटांकडे संपूर्ण फलटण तालुक्यातील मतदारांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
दरम्यान यावेळी फलटण तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गट असून या मधील चार गट आरक्षित आहेत,तर दोन गट नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) व एक कोळकी गट सर्वसाधारण तर हिंगणगाव गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे.यामध्ये खऱ्या अर्थाने लढत होईल ती कोळकी व हिंगणगाव गटात कोळकी गटातून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू सहकारी तसेच भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे व माजी आमदार स्व.चिमणराव कदम यांचे सुपुत्र सह्याद्री कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून पंधराच दिवसात शिवसेना पक्षातून उमेदवारी मिळविली आहे तर या ठिकाणी रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते,व उबाठा गटातून अभिजित विजय कदम,बसपा कडून प्रेम मोरे,व अपक्ष राजेंद्र आप्पा चोरमले लढणार आहेत मात्र या मध्ये खरी लढाई ही जयकुमार शिंदे व सह्याद्री कदम यांच्या मध्येच होणार आहे.
तसेच हिंगणगाव गटात माजी जिल्हा परिषद सदस्या सारिका अनपट व किरण निलेश नलावडे व उबाठा गटाच्या शीतल सचिन झणझणे,व रासपाच्या सुप्रिया लक्ष्मण सूळ यांच्यात होणार आहे. त्यात खरी लढत सारिका अनपट विरुद्ध किरण नलावडे यांच्यात तुल्यबळ होणार आहे.

No comments