नगरसेवक सनी अहिवळे यांच्याकडून मंगळवार पेठेत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
![]() |
जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण प्रसंगी नगरसेवक सनी अहिवळे, सुपर्णा सनी अहिवळे व इतर |
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण - विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजिवराजे नाईक निंबाळकर , कृषी ऊत्पन्न बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार, कोरोना विषाणू संसर्ग थोपवण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर मंगळवार पेठ येथील प्रभाग क्रमांक २ मधील नगरसेवक तथा आरोग्य समिती सभापती सनी संजय अहिवळे यांनी मंगळवार पेठेतील १२०० कुटुंबियांना जिवनावश्यक वस्तुंचे किटचे वाटप केले.
या अगोदरही नगरसेवक सनी अहिवळे यांनी प्रभागातील नागरिकांना वेळोवेळी जीवनावश्यक वस्तूंचे किट्स, हॉस्पिटल साठी मदत केलेली आहे.
No comments