Breaking News

उपळेकर महाराज मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने फॅबीफ्ल्यु गोळया मोफत

On behalf of Uplekar Maharaj Mandir Trust Fabiflu pills free

    फलटण (प्रतिनिधी) - फलटण तालुक्यामध्ये कोरोना संसर्गजन्य आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर गरीब कुटुंबातील रुग्णांना फॅबीफ्ल्यु -400 या महागड्या गोळ्या घेणे परवडत नाही. या रुग्णांना फॅबीफ्ल्यु - 400 या महागडया गोळ्यांचे मोफत वाटप सदगुरु परमपूज्य उपळेकर महाराज मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात येत आहे. हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद व स्तुत्य असाच असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

    सदगुरु परमपूज्य उपळेकर महाराज मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने गरीब रुग्णांना फॅबीफ्ल्यु - 400 या महागडया गोळ्यांचे मोफत वाटप या उपक्रमाचा शुभारंभ सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सदगुरु परमपूज्य उपळेकर महाराज मंदिर ट्रस्टच्या सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, ट्रस्टचे पदाधिकारी हेमंत रानडे, ताईसाहेब रानडे, डॉ.संजय राऊत, डॉ.पोळ, डॉ.मेघना बर्वे मॅडम, विजय जाधव इ. मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. 

     पुढे बोलताना, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, जवळपास ४ लाख रुपये किमतीच्या या फॅबीफ्ल्यु -४०० या गोळ्या तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना वाटप करण्यात येणार असून, यामुळे ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना याचा निश्चितच फायदा होणार असल्याचे  श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले. 

    यावेळी बोलताना सदगुरु परमपूज्य उपळेकर महाराज मंदिर ट्रस्टच्या सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर म्हणाल्या की , सदरच्या गोळ्यांचे वाटप विजय मेडिकल स्टोअर्स येथे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

No comments