Breaking News

बधितांच्या संख्या तफावतीचा गोंधळ सुरूच! फलटण तालुक्यात 84 कोरोना बाधित

Corona virus Satara District updates :  26 died and 1990 corona positive

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 30 मे 2021 - फलटण तालुक्याची कालची कोरोना covid-19 बधितांची संख्या ही 84 आली आहे.  मात्र त्याच वेळी जिल्हा प्रशासनाकडून मिळालेली आकडेवारी गोंधळ उडवणारी असून, मागील काही दिवस असा गोंधळ निर्माण झाला आहे.  आज जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली फलटण तालुक्यातील  कोरोना बधितांची संख्या 271 आहे.  या तफावतीमुळे नागरिकांचा गोंधळ उडाला आहे. मात्र प्रशासन या गोंधळाकडे लक्ष देत नसल्याचे दिसते. 

    आज  मिळालेल्या  आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 84 बाधित आहेत.  यामध्ये फलटण शहर 6,  ढवळ 1, बरड 2, कोळकी 2, कुसुर 2, मठाचीवाडी 1, बिबी 3 , मिरेवाडी 1, पिंपरद 4, विडणी 2, जिंती 3, निंबळक 2, भाडळी 3, पाडेगाव 6, राजाळे 3, राजुरी 6, साखरवाडी 7, सोनगाव 1, दालवडी 1, वाठार निंबाळकर 1,  वेळोशी 1, चौधरवाडी 1, तरडफ ,  तरडगाव 1, तांबवे 2, तावडी 1, नांदल 9, कापडगाव 1, मुरूम 1, होळ 2, परहर 2, रावडी 2, तडवळे 2,आळजापूर 1.

जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या बातमीनुसार 

1990 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 26 बाधितांचा मृत्यू

 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1990 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 26 बाधितांचा मृत्यु झाला तर फलटण तालुक्यात 271 रुग्ण कोरोना बाधित सापडले असून 4 बधिताचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

      तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 75 (7447), कराड 231 (22053), खंडाळा 84 (10278), खटाव 262 (15584), कोरेगांव 250 (14163),माण 209 (11196), महाबळेश्वर 39 (4008), पाटण 158 (6750), फलटण 271 (25498), सातारा 336 (34952), वाई 62  (11489) व इतर 13 (1045) असे आज अखेर एकूण 164463 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

     तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 2 (166), कराड 4 (635), खंडाळा 3 (134), खटाव 4 (411), कोरेगांव 1 (312), माण 1 (208), महाबळेश्वर 1 (44), पाटण 0  (157), फलटण 4 (250), सातारा 3 (1022), वाई 3 (303) व इतर 0 असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3642 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

1 comment: