प्रभाग ९ मध्ये कु.राझिया मेहबूब मेटकरी यांच्या उमेदवारीला नागरिकांमधून प्रचंड प्रतिसाद
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.११ - फलटण नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ९ मधून श्री मेहबूबभाई मेटकरी यांची कन्या कुमारी राझिया मेहबूब मेटकरी यांच्या उमेदवारीला नागरिकांमधून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, प्रभाग क्र.९ महिला ओबीसी प्रवर्गातून खासदार गटातर्फे नगरसेवक पदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जातात.
मेहबूबभाई मेटकरी हे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे अत्यंत निष्ठावंत व विश्वासू मानले जातात, मागील निवडणुकीत मेहबूबभाई मेटकरी यांनी ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवली होती, राजेंची सत्ता असताना देखील रणजीतदादा यांच्या नेतृत्वात खंबीरपणे लढत दिली. त्यावेळी त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला, पण पराभवाने खचून न जाता, त्यांनी सामाजिक काम चालू ठेवले, ते नागरिकांच्या अडचणीला धावून जातात, त्यांच्या सामाजिक कामाचा व लोकांच्या समस्या सोडविण्याचा व मदत करण्याचा सतत प्रयत्न सुरू असतो. प्रभाग ९ मध्ये त्यांच्या कामाच्या जोरावर त्यांची मजबूत पकड आहे. प्रभाग ९ मध्ये खुला प्रवर्ग व महिला ओबीसी आरक्षण पडल्याने त्यांची कन्या कुमारी राझिया मेहबूब मेटकरी यांच्यासाठी खासदार गटाकडे उमेदवारी मागितली आहे, कुमारी राझिया मेटकरी या सुशिक्षित व उच्चशिक्षित युवा नेतृत्व म्हणून रणजितदादांच्या मार्गदर्शनाखाली उदयास येतील.

No comments