प्रभाग ८ मधून निलेश गायकवाड यांच्या उमेदवारीला सर्वसामान्य लोकांची पसंती
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२ नोव्हेंबर २०२५ - आश्वासक चेहरा, कष्टाळू मेहनती अन राजे घराण्याशी प्रामाणिक असलेले युवकांचे आशास्थान म्हणजे म्हणजे निलेश अशोक गायकवाड यांच्या उमेदवारीसाठी प्रभाग क्र. 8 मधील जनतेने त्यांच्या नावाला पहिली पसंती दिली असून, त्यांना नक्कीच राजेगटाकडून नेत्यांची सुद्धा पसंती मिळाली असल्याने आपल्या हक्काचा माणूस हाच आपला उमेदवार असे चित्र निर्माण झाले आहे.
प्रभाग क्र.8 मध्ये ओबीसी पुरुष आरक्षण असून या प्रभागात तरुण होतकरू मितभाषी व सर्वसामान्य लोकांना आपला माणूस अशी ख्याती असलेली, तसेच युवकांची फौज असलेला राजकारणापेक्षा समाजकारण व त्या माध्यमातून आपल्या व्यवसायाच्या तसेच युवकांच्या मनावर अधिराज गाजवणारे युवा नेतृत्व म्हणून निलेश गायकवाड यांचा चेहरा समोर आला असून, स्वच्छ चेहरा सर्वसामान्य लोकांच्यात मिळून मिसळून सर्वांच्या सुख दुःखात एक पाऊल पुढे असणाऱ्या निलेश गायकवाड यांना आठ नंबर प्रभागातील लोकांची पसंती असून त्यांना विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उमेदवारी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

No comments