Breaking News

चौधरवाडी येथे श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते सभामंडपाचे भूमिपूजन

The foundation stone of the Sabha pavilion was laid by Shrimant Sanjeev Raje at Chaudharwadi.

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० - फलटण तालुक्यातील चौधरवाडी, १९ फाटा भोसले वस्ती येथे आमदार फंडातून मंजूर झालेल्या सभा मंडपाच्या भूमिपूजनाचा समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. भूमिपूजन समारंभ श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व माजी आमदार दीपकराव चव्हाण यांच्या शुभहस्ते दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी  संपन्न झाला.

    कार्यक्रमास चौधरवाडी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    स्थानिक नागरिकांनी या मंडपाच्या उभारणीमुळे सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना योग्य स्थळ मिळणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत ग्रामीण विकासाच्या दिशेने ही एक सकारात्मक पायरी असल्याचे सांगितले.

No comments