फलटण नगरपरिषद निवडणूक : पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० - फलटण आगामी फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून (10 नोव्हेंबर) सुरुवात झाली असली, तरी पहिल्याच दिवशी कोणत्याही प्रभागातून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिली.
यंदा अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असल्याने उमेदवारी अर्जांची ऑफलाईन विक्री होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यभरातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. त्यानुसार आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर २०२५ आहे. अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होणार असून, अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २५ नोव्हेंबर २०२५ आहे.
फलटणसह जिल्ह्यातील इतर नगरपरिषदमध्येही उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज न आल्याने निवडणुकीच्या राजकारणात उत्सुकता निर्माण झाली आहे.

No comments