Breaking News

वाखरी तलावाच्या सांडव्यास भगदाड पडल्याने तलाव फुटण्याचा धोका

वाखरी ता. फलटण येथील तलावाच्या सांडव्यास पडलेल्या भगदाडातून वाहत असलेले पाणी

The lake at Wakhri is in danger of bursting due to a hole

    फलटण (प्रतिनिधी) - वाखरी ता. फलटण येथील तलावाच्या सांडव्यास भगदाड पडल्याने तलाव कोणत्याही क्षणी  फुटून गाव पाण्याखाली जाऊन जीवितहानी होण्याचा धोका आहे, त्यामुळे वाखरी तलावाची दुरुस्ती करण्यात येऊन ग्रामस्थांचे जीव वाचवावे अशी मागणी वाखरीच्या सरपंच यांनी प्रशासनाला केली  आहे.

       कायम दुष्काळी असा ठपका पडलेल्या वाखरी गावात  1980 साली जवळपास अर्धा टी एम सी ला थोडे कमी असलेल्या तलावाची निर्मिती करण्यात आली, हा तलाव सध्या जीर्ण झाला आहे या तलावावरील सांडव्या मध्ये भगदाड पडले असून या भिंतीच्या प्रत्येक ठिकाणी भेगा पडून मोठमोठी झाडे उगवली असून या झाडांमुळे हा तलाव कधीही फुटू शकतो व या मध्ये खूप मोठी दुर्घटना घडून वाखरी गाव तर वाहून जाईलच या बरोबरच लागून/ जवळ असलेल्या तरटे वस्ती,व वाठार निंबाळकर (जुने गाव) बाधित होऊ शकते, ही दुर्घटना घडण्यापूर्वी या तलावाची दुरुस्ती करावी अशी मागणी वाखरी ग्रामपंचायतीच्या सरपंच यांनी प्रशासनाला केली आहे.
वाखरी तलाव
    वाखरी गाव हे तब्बल तीन हजार लोकसंख्या असलेले गाव असून या गावची सर्व आर्थिक परिस्थिती या तलावावर व या मधील पाण्यावर अवलंबून आहे.गावच्या हद्दीतील शेत, पिण्याचे पाणी, आसपासच्या ओढे नालेतुन ओसंडून वाहत असतात या मुळे शेतीला पाणी मिळत आहे.  पावसाळ्यात गावात कोणालाही झोप लागत नाही,कधीही हा तलाव फुटू शकतो,व मोठी दुर्घटना घडू शकते,व कधीही भरून न येणारे गावचे नुकसान होऊ शकते, या तलावामुळे वाखरी गावचा विकास झाला आहे,या तलावात तब्बल दीड वर्ष पाणी टिकते,या मुळे गावाला धोम बलकवडी कडे पैसे भरून कालव्याचे पाणी घेण्याची आवश्यकता नाही,हे आमचे गावचे वैभव आहे मात्र हा तलाव फुटल्यास मोठी जीवित हानी होऊ शकते असे शुभांगी शिंदे यांनी सांगितले.

No comments