Breaking News

के. बी. उद्योग समुहाकडून जिंती कोरोना विलीगिकरण केंद्रास मदत

Assistance to Jinti Corona Separation Center from Kay Bee Industries Group

    फलटण (प्रतिनिधी) - : जिंती, ता. फलटण येथील कोरोना विलगीकरण केंद्रास के. बी. उद्योग समुहाच्यावतीने १५ वाफेचे मशीन, ३ ऑक्सिमिटर, टेंपरेचर मीटर, १ बी. पी. मशीन अशी सामुग्री भेट  देण्यात आली असून गरजेनुसार आणखी आवश्यक मदतीचे आश्वासन के. बी. चे संचालक सचिन यादव यांनी दिले आहे.

    वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुका जिल्ह्यात आघाडीवर असल्यामुळे तालुक्यामध्ये चिंताजनक व भयावह वातावरण निर्माण झाले असून या परिस्थितीशी सामना करण्यासाठी तालुक्यातील अनेक गावांत ग्रामपंचायत, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आले आहेत. या कक्षामध्ये कोरोना बाधीतांवर उपचार आणि त्यांची निवास, भोजन व्यवस्था करण्यात आल्याने, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यास मदत होत आहे.

    विलगीकरण केंद्र सुरु केल्यानंतर, तेथील वाढत्या रुग्ण संख्येला पुरेशा आरोग्य व नागरी सुविधा देताना इतरांची मदत घ्यावी लागत असल्याने जिंती येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी के. बी. चा दरवाजा ठोठावला, के. बी. चे सर्वेसर्वा सचिन यादव यांना विलगी करणातील समस्यांची माहिती देवून मदत करण्याची विनंती केली.

    सचिन यादव यांनी त्यांची आपुलकीने चौकशी करुन जिंतीच्या या पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांना तांत्रिक मुद्द्यावर माहिती देवू मार्गदर्शन केले आणि वरीलप्रमाणे वैद्यकीय साधने देवून आणखी मदतीचे आश्वासन दिले आहे.

    के. बी. च्यावतीने प्रशासनाधिकारी हेमंत खलाटे व अन्य अधिकाऱ्यांनी जिंती, ता. फलटण येथे कोरोना केअर सेंटरला भेट देवून सदर वैद्यकीय साधने सुपूर्द केली. त्यावेळी प्रमुख पदाधिकारी, ग्रामस्थ, रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.

No comments