गुणवरे ग्रामपंचायत सरपंचपदी सौ. शशिकला गावडे, उपसरपंचपदी प्रा. रमेश आढाव
![]() |
सरपंच व उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर सौ. शशिकला जिजाबा गावडे व प्रा. रमेश तुकाराम आढाव व इतर |
फलटण - गुणवरे, ता. फलटण ग्रामपंचायत सरपंचपदी सौ. शशिकला जिजाबा गावडे यांची आणि उपसरपंच पदी ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश तुकाराम आढाव यांची निवड करण्यात आली असून त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
प्रा. रमेश आढाव गेली अनेक वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत असून दै. तरुण भारत तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. वृत्तपत्र प्रतिनिधी म्हणून काम करताना विविध सामाजिक संस्था संघटनांच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक चळवळीत मोठे योगदान राहिले आहे. अनेक सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. रेल्वे आणि टेलिफोन सल्लागार समितीवर त्यांनी उत्तम काम केले आहे.
सरपंच सौ. शशिकला जिजाबा गावडे व उपसरपंच प्रा. रमेश तुकाराम आढाव यांचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी त्यांना शभेच्छा दिल्या आहेत.
No comments