Breaking News

कृषी महाविद्यालय, फलटणच्या माजी विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय अविष्कार संशोधन उपक्रमात यश

Alumni of Agricultural College, Phaltan achieve success in state-level innovation research initiative

       फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१२ 13:     महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यता प्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय, फलटण येथील माजी पदवीपूर्व विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय अविष्कार संशोधन उपक्रमात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

    वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे आयोजित राज्यस्तरीय अविष्कार संशोधन उपक्रमात महाराष्ट्रातील तीन वेगवेगळ्या विद्यापीठांचे प्रतिनिधित्व करत कृषी महाविद्यालय, फलटणचे तीन माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. अविष्कार संशोधन उपक्रमात कुमार प्रशांत मचाले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, कुमारी ऋतुजा भामे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, कुमार यश भोसले, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला या तिन्ही विद्यार्थ्यांनी आपापल्या विद्यापीठांचे प्रतिनिधित्व करत संशोधन सादरीकरण केले आहे. कृषी महाविद्यालय, फलटणच्या माजी विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय मंचावर विविध विद्यापीठांचे प्रतिनिधित्व करणे ही महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब असून, यामुळे संस्थेतील शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन क्षमता, नवोन्मेषाची संस्कृती व आंतरविषयक शिक्षणाची मजबूत परंपरा अधोरेखित होते.

    माजी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, महाविद्यालयातील प्राध्यापक, मार्गदर्शक, सांस्कृतिक विभाग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments