फलटण येथे रविवारी मान्यवरांच्या हस्ते वरिष्ठ स्तर न्यायालयाचे उद्घाटन
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१४ फेब्रुवारी २०२५ - फलटण येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या न्यायालयाचे उदघाटन आज रविवार दिनांक 15/2/2026 रोजी सकाळी 11.30 वाजता न्यायमूर्ती श्री नितीन आर.बोरकर साहेब, यांच्या शुभहस्ते आणि न्यायमूर्ती श्री अनिल पानसरे, न्यायमूर्ती राजेश पाटील, न्यायमूर्ती श्री संजय देशमुख, न्यायमूर्ती श्री रणजितसिंह भोसले तसेच सातारा सत्र न्यायाधीश जिल्हाप्रमुख श्री.अरविंद वाघमारे, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश फलटण श्री राजेंद्र पाटील भोसले, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चेअरमन ॲड हर्षद निंबाळकर, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा माजी चेअरमन व सदस्य ॲड विठ्ठलराव कोंडे देशमुख, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा माजी चेअरमन व सदस्य ॲड.वसंतराव भोसले यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.
उदघाटनाचा कार्यक्रम दिवाणी व फौजदारी न्यायालय फलटण (विमानतळ कोर्ट) येथे मुख्य अतिथी व फलटण वकील संघ कार्यकारणी यांचे उपस्थितीत होणार आहे. त्याचे थेट प्रक्षेपण सजाई गार्डन मंगल कार्यालय येथे स्क्रीनवर दाखविण्यात येणार आहे व त्यानंतरचा मुख्य कार्यक्रम सजाई गार्डन मंगल कार्यालय, फलटण- विंचुर्णी रोड , फलटण येथे होणार असल्याची माहिती फलटण वकील संघाचे अध्यक्ष ॲड.नितीन जाधव यांनी दिली.

No comments