निंभोरे ग्रामपंचायत सरपंचपदी सौ.कांचन निंबाळकर तर उपसरपंचपदी मुकुंदराव रणवरे
![]() |
सरपंच व उपसरपंच पदी निवड झाल्यानंतरसौ.कांचन निंबाळकर, मुकुंदराव रणवरे (काका) व इतर |
निंभोरे - विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , जिल्हा परिषद सातारा चे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निंभोरे, ता.फलटण ग्रामपंचायत "सरपंच"पदी सौ.कांचन रमेश निंबाळकर,"उपसरपंच" पदी श्री.मुकुंदराव आण्णासाहेब रणवरे (काका) यांची निवड झाली असून या निवडीनंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
श्री. मुकुंदराव रणवरे (काका) हे विधानपरिषद सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांचे स्वीय सहाय्यक असून यापूर्वी त्यांच्या पत्नी सरपंच होत्या तर आता उपसरपंचपदी त्यांची निवड झाली आहे.
विधानपरिषद सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ.दिपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सह अनेकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments