Breaking News

फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत एकूण ७१.८१ टक्के मतदान

Total voter turnout in Zilla Parishad and Panchayat Samiti elections in Phaltan taluka was 71.83 percent

    फलटण दिनांक 7 ( प्रतिनिधी ) फलटण तालुक्यात झालेल्या सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ७१.८१ टक्के मतदान झाले असून महिला मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. फलटण तालुक्यात सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपा राष्ट्रवादी युतीच्या विरोधात शिवसेना म्हणजे महायुतीतच खरी लढत झाली.भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार सचिन पाटील व  राष्ट्रवादीचे नेते शिवरूपराजे खर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा व राष्ट्रवादी या युतीच्या विरोधात विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे बंधू माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गट अशी जिल्हा परिषदेचे आठ गट व पंचायत समितीच्या सोळा गणामध्ये लढत झाली.

    तरडगाव गटामध्ये भाजपाचे सूर्यकांत कृष्णा खरात व शिवसेना पक्षाचे गिरीश सुदाम बनकर यांच्यामध्ये सरळ लढत झाली असून साखरवाडी पिंपळवाडी गटामध्ये आरती दिनेश कांबळे, संचिता सागर कांबळे, रूपाली लक्ष्मण सरगर, प्रतीक्षा रोहन मोहिते, विडणी गटामध्ये ज्योती गौतम मोरे, सुषमा अविनाश मोरे आणि प्रतीक्षा विवेक मोरे, गुणवरे गटामध्ये ऋतुजा अभिजीत जगताप, हेमलता अनिल जगताप, प्रियंका मंगेश मोरे, बरड गटामध्ये वैशाली संदीप कांबळे, भाऊसाहेब पोपट मोरे, प्रेम जयश्री सुरेश मोरे, गंगाराम अरुण रणदिवे, रामदास विठ्ठल केंगार, अनिल विठ्ठल रणदिवे. कोळकी गटामध्ये अभिजीत विजय कदम, सह्याद्री सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम, प्रदीप उर्फ प्रेम सुरेश मोरे, जयकुमार अरविंद शिंदे, काशिनाथ साधू शेवते, राजेंद्र अप्पा चोरमले. वाठार निंबाळकर गटामध्ये दुर्योधन सोमनाथ ननावरे, निलेश बापू लोखंडे, विष्णू किसन लोखंडे, खंडेराव पांडुरंग सरक, निवृत्ती अशोक खताळ तर हिंगणगाव गटामध्ये सारिका धैर्यशील उर्फ दत्ताबापू अनपट, शितल सचिन झणझणे, किरण निलेश नलावडे, सुप्रिया लक्ष्मण सूळ हे उमेदवार आहेत.

    पंचायत समितीच्या पाडेगाव गणामध्ये अमोल बन्यासो खराडे, आकाश राजकुमार गायकवाड, राहुल दादासो नरुटे, नितीन बापूराव सुळ. तरडगाव गणामध्ये योगिता दीपक गायकवाड, स्मिता प्रशांत गायकवाड, शितल महादेव कुलाळ. साखरवाडी पिंपळवाडी गणामध्ये शिवांजली विक्रमसिंह भोसले, कमलताई शंकर माडकर. सस्तेवाडी गणामध्ये विजय आप्पासो भिसे, गणेश मल्हारी तांबे, ऋतुजा सागर कुंभार. सांगवी गणामध्ये सौ. पुष्पा रामचंद्र चोपडे, सौ. सारिका संजय सोडमिसे. विडणी गणामध्ये सचिन गजानन अभंग, डॉ. किरण उत्तमराव शेंडे. गुणवरे गणामध्ये वनिता धनाजी आढाव, वैशाली अतुल कांबळे, ज्योती अनिकेत बागाव. आसूगणामध्ये भीमराव दामोदर पवार, संजय रघुनाथ पवार. बरडगणामध्ये स्वाती हनुमंत आटोळे, अनिता संतोष गावडे, साक्षी काशिनाथ शेवते. दुधेबाबी गणामध्ये मनीषा लक्ष्मण सोनवलकर, विजया हनुमंत सोनवलकर, मयुरी भाऊसो सोनवलकर. कोळकी गणामध्ये अशोक गेनबा नाळे, विकास अशोक नाळे, सुनील गंगाराम सोनवलकर, ज्ञानदेव सावता शिंदे. जाधववाडी गणामध्ये अमोल दशरथ सस्ते, युवराज नरसिंग सस्ते, निर्भय चंद्रकांत काकडे. वाठार निंबाळकर गणामध्ये स्वाती विकास तरटे, अश्विनी किरण यादव, शुभांगी तुकाराम शिंदे, संजना संतोष करे. सुरवडी गणामध्ये महेंद्र विठ्ठल घाडगे, किरण लक्ष्मण साळुंखे, धनंजय प्रल्हादराव साळुंखे, लक्ष्मीकांत धनसिंग लांडगे, रणजीत सिताराम मोहिते, सासवड गणामध्ये संतोष हनुमंत खताळ, संतोष अंकुश कारंडे, हिंगणगाव गणामध्ये सीमा शरद भोईटे इनामदार, व सीमा सुरेश भोईटे यांच्यामध्ये लढत झाली.

    या सर्व लढतीपैकी कोळकी जिल्हा परिषद गटामध्ये माजी आमदार चिमणराव कदम यांचे चिरंजीव सह्याद्री कदम आणि भारतीय जनता पार्टीचे जयकुमार अरविंद शिंदे यांच्या लढती बरोबरच तालुक्यातील सर्व लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहीले आहे.

    माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माजी जिल्हा परिषद सदस्या जिजामाला नाईक निंबाळकर यांनी निंभोरे येथे आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले, तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी  कोळकी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी सुरवडी येथे आपल्या कुटुंबासहित मतदानाचा हक्क बजावला. यावेळी सुरवडीच्या सरपंच शरयु साळुंखे पाटील उपस्थित होत्या. फलटण तालुक्यातील अनेक मतदान केंद्रावर लाडक्या बहिणींनी रांगा लावून मतदान केले. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि  आमदार सचिन पाटील यांनी फलटण तालुक्यातील अनेक मतदान केंद्रावर जाऊन पाहणी केली.

तडवळे येथे एका नववधूने लग्नमंडपात जाण्यापूर्वी नागरिक म्हणून आपले कर्तव्य बजावत मतदानाचा हक्क पार पाडला. विवाहाच्या आनंदी क्षणांपूर्वीच तिने लोकशाहीप्रती आपली जबाबदारी जपल्याने सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. याचप्रमाणे सोनवडी येथेही एका नववधूने विवाहसोहळ्याच्या दिवशी मतदान करून आदर्श उदाहरण घालून दिले.

ढवळ येथे मतदान यंत्र खूप धिम्या गतीने चालत होते, त्या नंतर ते बंद पडल्याने काही काळ तिथं गोंधळ उडाला होता.तसेच मुंजवडी येथेही मशीन बंद पडले होते.

चक्क दारूचे दुकान मतदानादिवशी सुरु असल्यामुळे पोलिसांनी व उत्पादन शुल्क विभागाने त्या दुकानदाराकडून पैसे घेतल्याची चर्चा हणमंतवाडी येथे सुरु होती.

No comments