Breaking News

विडणी - पिंप्रद येथे आघोरी साधू ; ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले

Vidani - Aghori Sadhu in Pimprad; Villagers caught him and handed him over to the police

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.६ फेब्रुवारी २0२६ - उत्तर प्रदेश रजिस्ट्रेशनच्या गाडीतून आलेले काही आघोरी साधू फलटण - विडणी -पिंप्रद परिसरात अघोरी क्रिया करण्याच्या उद्देशाने आल्याची माहिती माहिती विडणी ग्रामस्थांना समजली.  त्यांनतर स्थानिक कार्यकर्त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करत संबंधित आघोरी साधूंना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

    या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व विडणी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी घटनास्थळावर येत संबंधित साधूंची माहिती घेतली, त्या माहितीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या घरा शेजारून ते साधू फिरून आल्याचे समजले मात्र रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी  विषय न वाढवता व जमावकडून काही अनुचित प्रकार घडण्याअगोदर, बाहेरून आलेल्या त्या साधू लोकांना मार्गस्थ केले.

No comments