आघोरी तांत्रिक आणून निवडणूक जिंकता येत नाही - रणजितसिंह नाईक निंबाळकर
आघोरी विद्या करणाऱ्यांना रणजितदादांनी मोठ्या मनाने माफ केले - सागर अभंग
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.६ फेब्रुवारी २०२६ - तंत्र मंत्र विद्येचा वापर करून तुम्ही निवडणूक जिंकू शकत नाही, त्यासाठी विकासाची कामे करावी लागतात व मने जिंकावी लागतात असा उपरोधिक टोला रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांना लागवून, अघोरी तांत्रिक आणून माझ्या बंगल्यावर मंत्रतंत्र करून, तुम्हाला काही मिळणार नाही, अशा गोष्टी जर विद्याने होत असतील तर या देशावर आघोऱ्यांनी राज्य केले असते, असे सांगून रणजितसिंह यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला.
आघोरी साधू विडणी परिसरात अघोरी क्रिया करण्यासाठी आल्याची माहिती मिळताच स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या पार्श्वभूमीवर मा.खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर माध्यमांशी बोलत होते.
विडणी गटामध्ये विरोधकांना त्यांची हार दिसत असल्यामुळे, त्यांनी अघोरी विद्येचा आधार घेतला आहे, मात्र विडणी ग्रामस्थांनी त्यांना पाठलाग करून पकडले, व त्या साधूंना पोलिसांच्या ताब्यात दिल, त्यांच्याकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या घराच्या आजूबाजूला फेरी मारल्याचे समजत आहे, मात्र रणजीतदादांनी मोठे मन करून त्या साधूंना कोणतीही इजा न पोहोचवता मार्गस्थ केले असल्याचे विडणी गावचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
.jpg)
No comments