आघोरी प्रकरण माजी खासदारांचा राजकीय स्टंट ; अघोरी साधूंना का सोडले? माजी खासदारांनीच बोलावले असावेत - संजीवराजे नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.६ फेब्रुवारी २0२६ - अघोरी साधू फलटणमध्ये आलेले मला माध्यमातून समजले, अघोरी विद्येवर आमचा कधीही विश्वास नव्हता व नाही, आम्हाला आमच्या आजींकडून वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला आहे व महाराजसाहेबांकडून श्रीराम व आई तुळजाभवानी हे आपले दैवत असल्याचे मनावर बिंबवले गेले आहे, त्यामुळे महाराज, तांत्रिक मांत्रिक असे वातावरण लहानपणापासून कधीही नव्हते, त्यामुळे अशा प्रकारची आम्हाला माहिती नाही, परंतु माजी खासदारांनी रामराजे यांचे नाव घेऊन राजकीय स्टंट केला तो चुकीचा आहे. अघोरी साधूंना पकडल्यानंतर माजी खासदार पळत पळत त्या ठिकाणी का गेले असा सवाल उपस्थित करून तांत्रिक मांत्रिकावर आम्ही कधीही विश्वास ठेवलेला नाही त्यामुळे आम्ही असला प्रकार करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
अघोरी विद्या करणारे साधू जर पकडले होते तर त्यांना लगेच सोडून का दिले? अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत त्यांना पोलिसांच्या ताब्यात देऊन, त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती. मात्र तसं न करता माजी खामदार तिथे पळत पळत येतात व त्यांना सोडून देतात, याचं कोडं उलगडत नाही. त्यांनीच त्या साधूंना बोलवले असावे व पकडले गेल्यामुळे त्यांना सोडून दिले व दुसऱ्याचे नाव घेत असल्याची शंका निर्माण होत आहे, रामराजेंचे नाव घेऊन माजी खासदार राजकीय स्टंट करत असल्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
अघोरी साधू या प्रकरणात रामराजे साहेबांचे नाव घेऊन खासदारांनी निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी रडीचे डाव सुरू केले आहेत. या प्रकरणाची चौकशी व्हावी व संबंधितांवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी असे निवेदन शिवसेनेमार्फत देणार असल्याचे श्री नगरसेवक श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले
.jpg)
No comments