जाधववाडी (फ) गावच्या सरपंच पदी सीमा गायकवाड तर उपसरपंचपदी सौ. नयन जगदाळे
![]() |
सरपंच व उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर सीमा आबाजी गायकवाड व सौ. नयन जगदाळे |
फलटण : फलटण शहरा शेजारी असणाऱ्या व वेगाने विस्तारित असणाऱ्या जाधववाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सीमा गायकवाड तर उपसरपंचपदी सौ. नयन जगदाळे यांची निवड करण्यात आलेली आहे.
जाधववाडी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत निष्ठावंत राजे पॅनलच्या वतीने विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली व दीपक सपकाळ व हरिभाऊ जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढविण्यात आलेली होती. या निवडणुकीमध्ये निष्ठावंत राजे पॅनेलच्या सीमा गायकवाड यांची सरपंच पदी निवड झालेली आहे. तर उपसरपंचपदी निष्ठावंत राजे पॅनेलचेच सौ. नयन जगदाळे यांची निवड करण्यात आलेली आहे.
No comments