Breaking News

निंबळक ग्रामपंचायत सरपंच पदी राजेंद्र मदने तर उपसरपंच पदी सौ. जयश्री मोरे

सरपंच व उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर राजेंद्र लालासाहेब मदने, व सौ. जयश्री जयराम मोरे ग्रामविकास अधिकारी शिंदे 

Rajendra Madane as Nimbalak Gram Panchayat Sarpanch and Jayashree More as Deputy Sarpanch

    फलटण  : निंबळक ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून उद्योजक राम निंबाळकर यांना चौथ्यांदा बहुमत देऊन ग्रामस्थांनी विश्वास व्यक्त केला आहे. सरपंच/उपसरपंच निवड एकमताने बिनविरोध पार पडली. त्यामध्ये सरपंच पदासाठी राजेंद्र लालासाहेब मदने, उपसरपंच पदासाठी सौ. जयश्री जयराम मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मुदतीत या दोघांचेच अर्ज दाखल झाल्याने त्यांची निंबळक ग्रामपंचायत सरपंच/ उपसरपंच पदावर बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा अध्यासी अधिकारी जाधव यांनी केली.

No comments