फलटण तालुक्यात शिवसेनेला मोठं यश ; जिल्हा परिषद 5 व पंचायत समितीच्या 8 जागांवर विजय
फलटण गंधवार्ता वृतसेवा दि.९ फेब्रुवारी २०२६ - अतिशय चुरशीने झालेल्या जिल्हा परिषद गटात शिवसेना राजेगटाने तब्बल आठ पैकी पाच जागा जिंकत करिश्मा केला आहे, तर पंचायत समितीच्या 16 पैकी 8 जागा जिंकून शिवसेना व भाजप - राष्ट्रवादी ने 8 समसमान जागा जिंकल्या आहेत.
दरम्यान तब्बल नऊ वर्षांनी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांच्यात तुल्यबळ लढती झाल्या, यामध्ये कोळकी गटातून माजी आमदार स्व.चिमणराव कदम यांचे चिरंजीव सह्याद्री कदम यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे अत्यंत विश्वासू सहकारी जयकुमार शिंदे यांचा मोठ्या फरकाने दारुण पराभव केला तर वाठार निंबाळकर गटातून भाजपचे उमेदवार विष्णू लोखंडे यांनी शिवसेनेचे नीलेश लोखंडे यांचा पराभव केला तसेच गुणवरे गटातून सौ.ऋतुजा अभिजित जगताप(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) यांनी सौ.हेमलता अनिल जगताप यांचा पराभव केला तसेच बरड गटातून शिवसेना उमेदवार सौ. वैशाली संदीप कांबळे यांनी भाजपाचे उमेदवार भाऊसाहेब मोरे यांचा पराभव केला तर हिंगणगाव गटात दोन वेळा मत मोजनी करूनही या ठिकाणी भाजपाने ॲड.सौ.किरण निलेश नलावडे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.सारिकाताई धैर्यशील उर्फ दत्ताबापू अनपट यांचा धक्कादायक पराभव केला, साखरवाडी पिंपळवाडी गटातून श्रीमती रूपालीताई लक्ष्मण सरगर यांनी सौ. संचिता सागर कांबळे यांचा पराभव केला,तरडगाव गटातून सेनेचे गिरीश बनकर यांनी एकतर्फी विजय मिळवून भाजपाचे सूर्यकांत उर्फ बंडा नाना खरात यांचा प्रचंड मतांनी पराभव केला.विडणी गटातून सौ.ज्योती गौतम मोरे यांनी सौ. सुषमा अविनाश मोरे यांचा अगदी थोड्या फरकाने पराभव केला.
आज झालेल्या तरडगाव पंचायत समिती गणातून सौ.योगिता दिपक गायकवाड यांनी भाजपाच्या सौ. स्मिता प्रशांत गायकवाड यांचा पराभव केला, तसेच पाडेगाव पंचायत समिती गणातून राहुल दादासो नरुटे यांनी अमोल खराडे यांचा मोठा पराभव केला, साखरवाडी पिंपळवाडी गणातून युवानेते विक्रमसिंह भोसले यांच्या कन्या कु. शिवांजली भोसले यांनी माजी पंचायत समिती सभापती शंकरराव माडकर यांच्या पत्नी सौ.कमलताई माडकर यांचा पराभव केला, सस्तेवाडी पंचायत समिती गणातून गणेश मल्हारी तांबे यांनी अगदी थोड्या मतांनी भाजपाचे विजय भिसे यांचा धक्कादायक पराभव केला. विडणी गणातून माजी पंचायत समितीचे उपसभापती संजय सोडमिसे यांच्या पत्नी सौ.सारिकाताई सोडमिसे यांना धक्का देत सौ.पुष्पा रामचंद्र चोपडे यांनी पराभव केला.तर विडणी गणात अक्षरशः काळजाचा ठोका चुकवणारा निकाल शेवटपर्यंत लागत होता, त्यामध्ये सचिन गजानन अभंग (अध्यक्ष) यांनी डॉ.किरण उत्तमराव शेंडे यांचा शेवटच्या क्षणी पराभव केला. गुणवरे गणातून सौ.वनिता धनाजी आढाव(Ncp) यांनी सौ. वैशाली अतुल कांबळे यांचा पराभव केला.आसू गणातून भिमराव दामोदर पवार यांचा संजय रघुनाथ पवार यांनी पराभव केला,बरड गनातून सौ.आटोळे स्वाती हणमंत यांनी सौ.अनिता संतोष गावडे यांचा पराभव केला. दुधेबावी गणातून सौ. विजया हणमंत सोनवलकर यांनी सौ.मनिषाताई लक्ष्मण सोनवलकर यांचा पराभव केला.कोळकी गणातून विकास अशोक नाळे यांनी डॉ.अशोक गेनबा नाळे यांचा पराभव केला तर जाधववाडी फ. गणातून अमोल दशरथ सस्ते यांनी युवराज सस्ते यांचा पराभव केला,वाठार निंबाळकर गणातून सौ.शुभांगी तुकाराम शिंदे यांनी सौ.स्वाती विकास तरटे यांचा पराभव केला,सुरवडी गणातून पंचायत समिती माजी सदस्य धनंजय साळुंखे पाटील यांनी किरण साळुंखे पाटील यांचा दारुण पराभव केला, हिंगणगाव गणातून सौ.सीमा सुरेश भोईटे यांनी सौ.सीमा शरद भोईटे इनामदार यांचा धक्कादायक पराभव केला,सासवड गणातून संतोष अंकुश कारंडे(शिवसेना)यांनी संतोष हणमंत खताळ यांचा पराभव केला,यामुळे दोन्ही गटाला समसमान आठ जागा जिंकल्या असून आता सभापती हा चिठ्ठीवर निवडला जाणार आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीत राजेगटाचा पराभव झाला होता त्या नंतर पुन्हा एकदा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्याचा वचपा राजेगट शिवसेनेने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आठ पैकी पाच जागा जिंकून काढला तर पंचायत समितीचे आठ उमेदवार निवडून आले असल्याने इथून पुढे काय घडामोडी घडतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments