Breaking News

जागतिक महिला दिना निमित्त डाक विभागाद्वारे महिलांसाठी विशेष उपक्रमांचे आयोजन

Organizing special activities for women by the Postal Department on the occasion of International Women's Day

         सातारा  (जिमाका): जागतिक महिला दिना निमित्त सातारा डाक विभागाद्वारे दि. 1 ते 6 मार्च 2021 या कालावधीत खास महिलांकरीता नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्ड दुरुस्ती करणे, सुकन्या समृध्दी योजनेच्या माहितीचा प्रचार प्रसार करणे व पात्र मुलांचे खाते उघडणे असे अनेकविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याचे वरिष्ठ अधिक्षक डाकघर श्रीमती उपराजिता म्रिधा यांनी सांगितले.

            तसेच दि. 1 व 2 मार्च रोजी पिराचीवाडी (फलटण), भाटमरळी, पाली, खिंडवाउी, तारुख, भुईंज, लाडेगाव. दि. 3 व 4 मार्च रोजी  निरगुडी (फलटण), वारोशी (मेढा), तळबीड, कामेरी, मालदन, आसरे (वाई), गोरेगाववांगी. दि. 5 व 6 मार्च रोजी कोपर्डे, अंबवडे, वाघोली(वडुथ), विहे वसाहत, बनडी, रेठरे बु., सोनके, पळशी (खटाव) येथे पेन्शन योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना जननी सुरक्षा योजना, किसान सन्मान योजना यांचा घरपोच लाभ घेण्यासाठी इंडिया  पोस्ट पेमेंट खाते डघडण्याचा कार्यकम आयोजित केला आहे. याचा लाभ सर्व ग्राहकांनी विशेष करुन महिलावर्गांनी घ्यावाअसे आवाहनही श्रीमती म्रिधा यांनी केले आहे.

No comments