Breaking News

जबरी चोरी व चोरी सारख्या 9 गुन्ह्यातील आरोपीस फलटण पोलिसांकडून अटक ; 2 लॅपटॉप 11 मोबाईल जप्त

पत्रकार परिषदेत बोलताना पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल शेजारी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक भारत किंद्रे  व कारवाईत सहभाग घेतलेले पोलिस पथक
        Accused of 9 crimes like Robbery and theft arrested by Phaltan police

        गंधवार्ता वृत्तसेवा,फलटण दि. 26 फेब्रुवारी 2021 - शहरातील संजीवराजे नगर, लक्ष्मीनगर, गोळीबार मैदान, गिरवीनाका रोड,जाधववाडी रोड, विमानतळ परीसरात अज्ञात चोरटे मोटार सायकल वरून येऊन विशेषतः महिलांच्या हातातील मोबाईल, पर्स हिसकावून घेऊन जाणाऱ्या चोरट्यास फलटण शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. जबरी चोरी व चोरी सारख्या 9 नऊ गुन्ह्यांमध्ये त्याचा समावेश असून त्याच्याकडून दोन लॅपटॉप व 11 मोबाईल व एक मोटरसायकल असा एकूण दोन लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली.

        फलटण शहर पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाई मध्ये एकूण 4 आरोपींना अटक करण्यात आली असून 2 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर फलटण येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत  पोलीस अधीक्षक बंसल बोलत होते याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, फलटण शहर पोलीस निरीक्षक भारत किंद्रे फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षक सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक एन आर गायकवाड उपस्थित होते.

        सुमारे दोन महीन्यापासून फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत लक्ष्मीनगर, संजीवराजे नगर, गोळीबार मैदान, स्वामी विवेकांनद नगर, अनंत मंगल कार्यालय, महाराजा मंगल कार्यालय या भागात मोपेड मोटार सायकल वरून जाणा-या यणा-या विशेषतः महिला/मूली यांना टार्गेट करून एक अनोळखी २० ते २२ यर्षे वयाचा चोरटा अंगाने सडपातळ शाईन मोटार सायकल वरुन त्यांचा पाठलाग करीत त्यांचे पाठोपाठ मोटार सायकल चालवित जात, आजु बाजुला तसेच मागे पुढे कोण नाही हे पाहून, संधी मिळताच महीला व मुलीचे हातातील पर्स, अथवा गाडीचे बास्केट, हैण्डेलला लावलेली पर्स उचलून व जबरदस्तीने हिसकावून घेऊन जात होता याशिवाय रस्त्याने मोबाईल फोनवर बोलत जाणा-या महिला/मुली यांचे हातातील मोबाईल जबरदस्तीने ओढून पोबारा करीत होता. या भागात सदरच्या चोऱ्या तो साधारण पणे आठ दिवसांचे फरकाने सातत्याने करीत होता.

        भारत किंद्रे पोलीस निरीक्षक फलटण शहर यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून सुमारे आठ ते दहा दिवसापासून दररोज सायंकाळी ६ ते ८.३० यावेळेत वरील भागात रिक्षा मध्ये स्पिकर लावून विशेषतः महिला/मूली वर्गामध्ये, एक अनोळखी चोरटा वय अंदाजे २० ते २२ वर्षे वयाचा महीलाचे जवळील बॅग, पर्स, मोबाईल तसेच गळयातील मंगळसुत्र/ गंठण जबरदस्तीने हिसकावून चोरून नेत असले बाबत सर्वांनी सावधान राहुन दक्षता घ्यावी तसेच सदर बाबत त्यांनी आपले स्वत:चा मोबाईल नंबर व पोलीस ठाणेचा नंबर देवून असा काही प्रकार घडलेस किंवा कोणाला काही माहीती मिळाल्यास त्यांचे नांव जाहीर न करता गोपनीय ठेवण्यात येईल या अटीवर अनाउंसमेंट करून जनजागृती करून जाहीर आवाहन करण्यात आलेले होते.

        सदर शाईन मोटार सायकल वरील अज्ञात चोरट्याची तो वापरीत असलेल्या वाहनांची मोठया कौशल्याने माहीती प्राप्त करून, दिनांक 23 फेब्रुवारी 2021 रोजी वरील भागात महिला व मुलींना टार्गेट करून, गाडीचे बास्केट मध्ये ठेवलेली पर्स तसेच मोबाईलवर बोलत असताना व हॅण्डलला लावलेली पर्स उचलून व मोबाईल हिसकावून घेवून जाणारा अज्ञात चोरटा, हा शाईन मोटार सायकल क्रमांक एम.एच.११ सी ७२५९ वरून त्याच पध्दतीने गुन्हे करण्यासाठी सदर भागात येत असल्याची खात्रीशीर माहीती प्राप्त झाल्याने, फलटण शहर पोलीस ठाण्यातील श्री.भारत किंद्रे पोलीस निरीक्षक फलटण शहर, एन आर गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक, सहाय्यक फौजदार एस.एन.भोईटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही. पी. टाकूर पोलीस हेड कॉन्स्टेबल आर.एस.भोईर, पोलीस नाईक एस.डी.सुळ, पोलीस नाईक एन.डी.चतुरे, पोलीस नाईक एस. ए.तांबे, पोलीस नाईक लावंड, पोलीस शिपाई अच्युत जगताप असे मोटार सायकल वरून पेट्रोलिंग व सापळा लावणे कामी रवाना होवून महाराजा मंगल कार्यालय, लक्ष्मीनगर फलटण येथे सापळा लावून थांबलेले असताना, माहीतील वर्णनाप्रमाणे व मोटार सायकल वरील संशयीत अज्ञात चोरटा मिळून आल्याने, त्यांस मोठ्या शिताफीने पकडून त्यांचे नाव विचारले असता त्याने त्यांचे नांव सुरेश रमेश कदम वय २२ वर्षे मुळ राहणार धुळदेव सध्या राहणार ब्राम्हणगल्ली पाटणे यांची चाळ फलटण ता. फलटण जि. सातारा असे सांगितले.

कारवाईत जप्त केलेला मुद्देमाल 

        आरोपी नामे सुरेश रमेश कदम वय २२ वर्षे मुळ राहणार धुळदेव सध्या रा. ब्राम्हणगल्ली पाटणे यांची चाळ फलटण यांस विश्वासात घेवून तपास केला असता, त्याने सदर कालावधीत फलटण शहरातील लक्ष्मीनगर, संजीवराजे नगर, गोळीबार मैदान, स्वामी विवेकांनद नगर, अनंत मंगल कार्यालय या भागात एकूण मालमत्तेचे ०९ गुन्हे त्यापैकी ०३ जबरी चोरी, व ०६ चोरीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आलेले असून त्यांचे कब्जातून ०२ लॅपटॉप त्यात ०१ एसार कंपनीचा, ०१ डेल कंपनीचा तसेच एकूण ११ मोबाईल हेण्डसेट त्यात ०२ ऍपल कंपनीचे, ०४ समसंग कंपनी, ०२ रेडमी कंपनीचा,०१ ओपो कंपनीचा, ०१ मोटो कंपनीचा,०१ रियलमी कंपनीचा व एक मोटार सायकल तसेच रोख रक्कमेसह एकूण २,२४,८००/-रूपये किंमतीचा माल हस्तगत करणेत आलेला आहे.

        तसेच चोरीचा मोबाईल हॅण्डसेट व चोरीचा लॅपटॉप घेणारे आरोपी नामे १)आशिष हेमंत अहिवळे वय २० वर्षे रा. सोमंथळी ता. फलटण जि सातारा २) मयुर संजय साळवे वय २० वर्षे ३) सौरभ संभाजी जाधव वय २० वर्षे दोन्ही रा. सुरवडी ता. फलटण जि. सातारा यांना गुन्हयाचे कामी अटक करणेत आलेली आहे. सदर आरोपी कडून आणखी तीन मोबाईल हॅण्डसेट हस्तगत करणेत आलेले असून त्याबाबत अधिक तपास सुरू आहे.

सदर कारवाई श्री.अजय कुमार बंसल सो.पोलीस अधिक्षक सातारा, श्री.धिरज पाटील  अपर पोलीस अधिक्षक सातारा, श्री. गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगांव अतिरिक्त कार्यभार फलटण उपविभाग व श्री.तानाजी बरडे  उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग फलटण यांचे मार्गदर्शनाखाली श्री. भारत किंद्रे पोलीस निरीक्षक फलटण शहर, एन आर गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक, एस.एन.भोईटे सहाय्यक फौजदार, प्ही. पी.ठाकूर पोलीस हेड कॉन्स्टेबल आर.एस.भोईर पोलीस हेड कॉन्स्टेबल , पी.एस.मदने पोहेकों, एस.डी.सुळ पोलीस नाईक ,एन.डी.चतुरे पोलीस नाईक,एस.ए.तांबे पोलीस नाईक,ए.एम.वाडकर पोलीस नाईक,एन.पी.भोसले पोलीस नाईक, व्ही.के.लावंड पोलीस नाईक , ए.एस.जगताप पोलीस शिपाई,डी.डी.नाळे पोलीस शिपाई यांनी केलेली आहे

No comments