Breaking News

राष्ट्रीय विक्रम मोडत एएसआयच्या खेळाडूंनी रचला इतिहास आणि टोकिओ ऑलिम्पिक्स 2021 साठी मिळविली पात्रता

ASI Athlete creates history by breaking National Record and Qualifying for Tokyo Olympics 2021

        रांची येथे आठवी राष्ट्रीय चालण्याची विजेतेपद स्पर्धा पार पडली, यात  एएसआयच्या खेळाडूंनी इतिहास रचत टोकयो ऑलिम्पिक 2021 साठी पात्रता मिळविली आहे. 16 जाट तुकडीचे नायब सुभेदार संदीप कुमार यांनी सुवर्णपदक मिळविले आणि 1:: 20:16 सेकंद इतक्या नोंदीसह नवीन राष्ट्रीय विक्रम रचला आणि 18 ग्रेनेडिअर्सचे ग्रेनेडिअर राहुल यांनी 1:: 20:26 सेकंद इतकी नोंद करीत रजत पदक मिळविले, दोघा खेळाडूंनी टोकियो 2021 साठी आपल्या पात्रता निश्चित केल्या आहेत.

        राष्ट्रीय खुली चालण्याची विजेतेपद स्पर्धा म्हणजे, कोविड 19 मुळे आलेल्या टाळेबंदीनंतर खेळाडूंसाठी प्रथमच झालेली मोठी विजेतेपद स्पर्धा ठरली. टोकिओ ऑलिम्पिक्स स्पर्धेच्या पात्रतेसाठी पुरुष खेळाडूंना 20 किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेसाठी 1 मिनिटे 21 सेकंद इतकी पात्रता वेळ निश्चित करण्यात आली आहे. एएसआयचे नायब सुभेदार इरफान के टी हे यापूर्वीच मार्च 2019 मध्ये नोमी, जपान येथे झालेल्या आशियाई चालण्याच्या विजेतेपद स्पर्धेतून टोकिओ ऑलिम्पिक्स स्पर्धेसाठी पात्र ठरले होते.

        संदीप, ज्यांनी 2016 रिओ ऑलिम्पिक्समध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करीत, 50 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत भाग घेतला होता, त्यांनी नायब सुभेदार इरफान टी आणि नायब सुभेदार देविंदर सिंह यांनी संयुक्तपणे केलेला 1:: 20:21 सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम मागे टाकला होता.

No comments